जबरदस्तीने बदली केल्यानं पोलीस निरीक्षक ‘रागात’ 64 KM धावला, नंतर ‘बेशुद्ध’ अवस्थेत आढळला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जबरदस्तीने बदली केल्यामुळे एका पोलीस निरीक्षकाचा बांध तुटला आणि मागचा पुढचा विचार न करता तो पळत सुटला. 40 किलोमीटर अंतरावर चंबळच्या खोऱ्यात पोहचल्यावर तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. युपीच्या इटावा जिल्ह्यातील ही घटना आहे. पोलिसांनी या व्यक्तीला ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. बदलीमुळे नाराज झालेल्या पोलीस निरीक्षकाने विरोध दर्शवण्यासाठी अजब कारनामा प्रकट केला आहे.

सकाळी नऊ वाजता या पोलीस निरीक्षकाने धावायला सुरुवात केली चाळीस पंचेचाळीस किलोमीटर दूर गेल्यावर चंबळच्या हनुमंतपुरा या ठिकाणी जाऊन तो बेशुद्ध पडला. त्यापाठोपाठ आलेल्या पोलिसांनी त्यांना स्थानिक रुग्णालयात भर्ती केले.

जीवाला कोणताही धोका नसल्याचे पोलीस निरीक्षकांनी सांगितले. मात्र आता वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बाबतची माहिती असून देखील त्यांनी हे थांबवलं का नाही म्हणून प्रश्न उपस्थतित केला जात आहे. धावत असताना मध्ये चार ते पाच पोलीस स्टेशन लागले परंतु कोठेही त्यांना थांबवण्यात आले नाही. जोरदार पळणारे विजय प्रताप यांनी सांगितले की, जबरदस्तीने बदली केल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला धावत जाण्याचा निर्णय घेतला होता.

Visit : Policenama.com