न्या. लोया मृत्यू प्रकरणाशी संबंधित ‘त्या’ पोलिस अधिकार्‍याचं निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी होणार असल्याची चर्चा सुरु असतानाच या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रविंद्र थोरात असे मृत्यू झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. रविंद्र थोरात यांचे 13 जानेवारी रोजी उस्मानाबाद येथे हृदविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे एका वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
रविंद्र थोरात हे सध्या लाचलुचपत विरोधी शाखेत उप अधीक्षक म्हणून कार्यरत होते. उस्मानाबाद येथील कार्यालयात काम करत असताना त्यांच्या छातीत दूखत असल्याने त्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. सोलापूर येथे त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.

न्या. लोया यांचा नागपूरमध्ये मृत्यू झाल्यानंतर रविंद्र थोरात यांनी लोया यांच्या कुटुंबाशी संपर्क साधला होता. राज्य गुप्तचर विभागाचे तत्कालीन प्रमुख संजय बर्वे यांनी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचे म्हटले होते. सुत्रांच्या माहितीनुसार, रविंद्र थोरात हे बर्वे यांच्या पथकातील सदस्य म्हणून काम करत होते. सुप्रीम कोर्टातील सुनावणी दरम्यान न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाशी निगडीत महत्त्वाच्या कागदपत्रांची जबाबदारी थोरात यांच्यावर होती.

न्या. लोया यांचा 2014 मध्ये नागपूर येथे मृत्यू झाल्यानंतर थोरात यांनी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता मात्र तातडीने त्यांच्या कुटुंबाशी संपर्क झाला नसल्याचे वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमले होते. यामध्ये रविंद्र थोरात हे सहभागी होते.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like