‘त्या’ पोलिस उपनिरीक्षकाचे तडकाफडकी ‘निलंबन’ !

पालघर : (नालासोपारा) पोलीसनामा ऑनलाइन – पालघर जिल्ह्यातील कल्याण शाखेत बदली करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांना अखेर निलंबित करण्यात आले. उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांना दोन गुन्हे दाखल झाल्याचे कारण सांगून पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी गुरुवारी आदेश काढून निलंबित केले. या निलंबनाने पालघर जिल्ह्यातील पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी वसई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांची काहीच दिवसांपूर्वी पालघरच्या कल्याण शाखेत बदली करण्यात आली परंतू तेथे हजर न राहता ते सुट्टीवर होते. यामुळे माजी पोलीस आयुक्त आणि यूपीचे खासदार सत्यपाल सिंग यांच्याबरोबर विचारे यांनी फोटो काढून सोशल मिडियावर पोस्ट केले होते. ही तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

त्यानंतर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना सांगण्यात आले. तुळींज पोलीस ठाण्यात विचारे यांच्यावर निवडणूक प्रक्रियेत अधिकारी किंवा कर्मचारी यांनी एखाद्या लोकप्रतिनिधीस मदत केल्यामुळे 129 (1), (2), (3) लोकप्रतिनिधी कायदा 1991 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे आणि नालासोपारा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा 145 कलमानव्ये एन सी 15 ऑक्टोबरला दाखल करण्यात आली होती.

हे दोन्ही गुन्हे दाखल झाल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षकांनी निलंबित केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. निवडणूक काळात एका पोलीस अधिकाऱ्यांला निलंबित केल्याने पालघर जिल्ह्यातील पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी