Latur : कौतुकास्पद ! जिगरबाज पोलिसानं वाचवला पुरात अडकलेल्या दोघांचा जीव

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन –   पुलावरून रस्ता ओलांडत असताना पाण्यात पडलेल्या दोघांचे जीव एका पोलीस कर्मचा-याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले. नेलवाड (ता. निलंगा) शिवारात बुधवारी ही घटना घडली. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचा-याने केलेल्या मदतीला नागरिकांनी सॅल्युट केला आहे. मन्मथ धुमाळ असे या पोलीस कर्मचा-याचे नाव आहे.

जोरदार पावसाने लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात नद्यासह सर्व तलाव भरली आहेत. कासार सिरशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले धुमाळ बुधवारी नेलवाड परिसरातील तलावावर कर्तव्यावर होते. यावेळी बसवकल्याणहून आलेल्या एका टेम्पोतून उतरून शिवाजी गायकवाड व एक तरुण उतरून पाण्यातून नेलवाडगावात जात होते. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही ओढ्याच्या प्रवाहात 20 फुट अंतर वाहून गेले अन एका झाडाला अडकले. यावेळी धुमाळ यांनी त्या दोघांना पाहिले. नागरिकांनी आरडाओरड सुरु केली. त्यावेळी धुमाळ यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दोघांचे प्राण वाचवले.