सुनील बोरकर यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  महाराष्ट्र राज्य पोलीस खात्यामध्ये 27 वर्षे सेवा अभिलेख उत्तम ठेवल्याबद्दल पोलीस महासंचालक पदक (बोधचिन्ह) हडपसर वाहतूक पोलीस स्टेशनमधील सुनील बोरकर यांना पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित केले आहे.

बोरकर यांना पोलीस महासंचालक पदक मिळाले, त्याबद्दल अनेक सामाजिक संस्था, संघटनांकडून अभिनंदन करण्यात आले. बोरकर एस.आर.पी.एफ. ग्रुप-1 पुणे शहर येथे पोलीस सेवेत भरती झाले. त्यांनी गडचिरोली, चंद्रपूर, आंध्र प्रदेश, बिहार येथे बंदोबस्तावर चोख कामगिरी बजावली आहे. बोरकर यांना आतापर्यंत 123 बक्षिसे देऊन गौरविण्यात आले आहे.