यावेळी आम्हाला बहुमत मिळणं अवघड : भाजपच्या ‘या’ नेत्याचे वक्तव्य

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह भाजपला या लोकसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी प्रयत्न करत असताना भाजपच्याच वरिष्ठ नेत्यांनी मोदी-शाहांच्या दाव्यातील हवा काढण्यास सुरुवात केली आहे. जेष्ठ नेते राम माधव यांनी भाजप बहुमतापासून दूर राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. राम माधव यांनीच मोदी-शाहांच्या बहुमताच्या दाव्याला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

यावेळी पुढे बोलताना राम माधव म्हणाले कि, आम्ही आमच्या (भाजप) ताकदीवर २७१ जागांचा आकडा गाठला तरी खूप होईल”, असे राम माधव म्हणाले. मात्र, एनडीएला पूर्ण बहुमत मिळेल आणि आम्ही पूर्ण बहुमतात येऊन सत्ता स्थापन करु, असाही विश्वास राम माधव यांनी व्यक्त केला आहे. उत्तर भारतात भाजपला २०१४ ला जितके यश मिळाले होते, तितक्या प्रमाणात यश यावेळी मिळणार नाही असदेखील ते यावेळी म्हणाले. मात्र, ईशान्य भारतातील राज्य आणि ओडीशा, पश्चिम बंगालमध्ये भाजपला फायदा होईल.” असे ते म्हणाले.

राम माधव यांची ओळख :
सध्या राम माधव यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी आहे. शिवाय, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे ते सदस्यही आहेत. राम माधव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक मानले जातात. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात त्याचे वजन आहे.