केसांची वाढ आणि सौंदर्यासाठी ‘अशा’ प्रकारे वापरा ‘खसखस’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  सर्वांच्या घरात सहज उपलब्ध होणारी खसखस अनेक आरोग्यदायी फायदे देते. खसखस हृदय आणि स्किनसाठी खूप चांगली असते. इतकंच नाही तर याचा केसांनाही खूप फायदा होता. केसांची वाढ आणि सौंदर्यासाठी तुम्ही खसखशीचा वापर करू शकता.

खसखशीमध्ये अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड्स, मॅग्नेशियम, झिंक आणि कॅल्शियम असतात. यामुळं स्कॅल्प हेल्दी राहण्यास खूप फायदा होतो. यामुळं केस तर सुंदर होतातच, शिवाय कोंड्याची समस्याही यामुळं दूर होते.

केसांच्या वाढीसाठी आणि सौंदर्यासाठी खसखशीचा वापर महत्त्वाचा आहे. शॅम्पू केल्यानंतर केसांमध्ये खसखस लावली तर अनेक आरोग्यदायी फायदे होतात. यासाठी खसखस 1-2 तास भिजत ठेवा. यानंतर यात लिंबाचा रस आणि मध एकत्र करा. आता हे मिश्रण केसांना लावा. एक तास ठेवल्यांतर स्वच्छ पाण्यानं केस धुवून काढा. तुम्ही यासाठी पुन्हा शॅम्पू करू शकता.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांचा अॅलर्जीही असते.