‘पॉर्न’ व्हिडीओ बघून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यानं केलं ‘विकृत’ कृत्य

भोपाळ : वृत्तसंस्था – भोपाळ मध्ये ५ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याची भयानक घटना समोर आली आहे. इंजिनियअरिंगच्या विद्यार्थ्याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याने हे सर्व पॉर्न व्हिडिओ पाहण्याच्या आहारी गेल्याने केलं असल्याचा समजत आहे . विरेंद्र परिहार असं या नराधमाचं नाव आहे. पोलिसांनी 5 वर्षांच्या चिमुरडीसोबत अत्याचार करणारा 24 वर्षीय विरेंद्र परिहार हा पीडितेचा शेजारीच राहत होता ही सर्व घटना भोपाळ येथील कोलोर ओरिसारातील आहे. पीडित मुलगी आणि तिची आई कॉलनी मध्ये होत्या. तिच्या आईला फोन आल्याने ती बोलत घरात गेली. त्या मुलीला आईने थोड्या वेळाने बाहेर आल्या नंतर आवाज दिला असता ती समोरच्या घराच्या छतावरून रडत खाली उतरलीं.

पीडित मुलगी रडत आल्याने आईने तिला काय झाले विचारले असता भयानक असा प्रकार समोर आला . त्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने पीडित मुलीला कबूतर दाखवण्याच्या बहाण्याने घरात घेऊन गेला आणि त्यानंतर त्याने तिच्यावर दुष्यकृत्य केलं. पीडित मुलीने घडलेला प्रकार सांगितल्या नंतर आईने थेट पोलीस स्टेशन गाठले. तरुणाविरोधात कोलार पोलीस स्टेशनमध्ये आईने तक्रार दाखल केली. महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेल्याचं पाहून आरोपीने घरातून पळ काढला होता. महिलेच्या तक्रारी वरून त्या आरोपीवर भादवी कलम 376, 376(3) आणि 5/6 पोक्सो अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला.

विरेंद्र परिहार हा मुळचा बैतूल जिल्ह्यातील मुलताई इथं राहणार आहे. भोपाळमध्ये कोलार परिसरात तो श्रीराम कॉलेजमध्ये इंजिनियरिंगचं शिक्षण घेण्यासाठी आला होता. या तरुणाचे बीईचे अंतिम वर्ष आहे. पोलिसांनी जेव्हा या नराधमाची चौकशी केली तेव्हा त्याने आपण पोर्न व्हिडिओ पाहण्याच्या आहारी गेलो असल्याचं कबूल केलंय. यातून हे सर्व केल्याचा त्याने सांगितले असं पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार समजले आहे.