सर्जरीनंतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती ‘क्रिटिकल’च, अद्यापही व्हेंटिलेटरवर : हॉस्पीटल

वृत्तसंस्था – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूवर काल (सोमवार) रात्री शस्त्रक्रिया झाली. ती यशस्वीरित्या पार पडली आहे. मात्र, सध्या मुखर्जी यांची प्रकृती क्रिटिकल असल्याचे तसेच ते व्हेंटिलेटरवर असल्याचं रूग्णालयानं सांगितलं आहे. मुखर्जी यांनी सोमवारी दुपारी स्वतः ट्विट करून आपल्याला कोरोना झाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

आपल्या संपर्कात आलेल्यांनी स्वतः कोरोनाची करून घ्यावी आणि आयसोलेट व्हावं असं देखील त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये सांगितलं होतं. सोमवारी रात्री मुखर्जी यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. मात्र, सध्या त्यांची प्रकृती क्रिटिकल असून ते व्हेंटिलेटर सपोर्टवर असल्याचं हॉस्पीटलनं सांगितलं आहे.