चमकदार आणि टवटवीत त्वचेसाठी नियमित करा फक्त ‘ही’ 6 योगासनं

पोलीसनामा ऑनलाइन  – बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, धूम्रपान, मद्यपान, तणावमुळे त्वचेवर नकारात्मक परिणाम दिसून येतात. यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडणे, त्वचेची चमक कमी होणे, त्वचेवर मुरुम येणे या समस्या निर्माण होतात. तसेच शरीरात होणाऱ्या संप्रेरक बदलाने अथवा खराब पचनाने त्वचेच्या समस्या उद्भवतात. म्हणून त्वचेच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आणि त्वचेला पुन्हा तजेलदार बनवण्यासाठी योगा (yoga) फायदेशीर ठरू शकतो.

काही योगासनांचा अभ्यास केल्यास डोके आणि चेहऱ्या जवळ असणाऱ्या भागाचा रक्तप्रवाह सुरळीत होतो. ज्याने त्वचा सुंदर आणि चमकदार बनण्यास मदत होते. उलट्या दिशेने डोके टेकून केलेल्या आसनांद्वारे मेंदूंमध्ये प्राणवायू आणि रक्ताचा प्रवाह अधिक होतो. चला तर जाणून घेऊया त्वचेसाठी कोणती योगासने फायदेशीर आहेत.

१. सर्वांगासन
हे आसन केल्याने त्वचा सैल होण्यास मदत मिळते. त्याने सुरकुत्या कमी होतात. त्वचेवरील मुरुम दूर होतात. हे आसन डोक्याला रक्तपुवठा करुन आळशीपणापासून मुक्त होण्यास मदत करते.

२. उर्ध्व धनुसासन
या आसनादरम्यान शरीर धनुष्याच्या आकारात असल्याने याला चक्रासनदेखील म्हटले जाते. या आसनात डोके खाली टेकलेले असते ज्याने रक्तप्रवाह अधिक होतो. चेहऱ्याची चमक सुधारण्यास मदत होते. ही प्रक्रिया अवघड आहे. पण नियमितपणे याचा अभ्यास केल्याने कंबरेत लवचिकता येते. या आसनाने फुफ्फुसात प्राणवायूचा प्रवाह वाढतो आणि पचन सुधारते.

३. शीर्षासन
सर्व आसनांचा राजा असे याला संबोधले जाते. सुरुवातीस हे करणे अवघड जाते पण याचे भरपूर फायदे आहेत. त्यातील एक म्हणजे सौंदर्य आणि त्वचेचं आरोग्य राखणे. हे आसन केल्यावर डोके खालच्या बाजूला जाते ज्याने चेहऱ्याला प्राणवायू पोहोचतो आणि रक्त परिसंचरण चांगले होते व चेहऱ्यावर चमक येते.

४. हलासन
हे आसन करताना शरीर नांगरासारखे होते. ज्याने थायरॉईड ग्रंथीला उत्तेजित करते आणि संप्रेरकांना नियंत्रित ठेवण्यास मदत होते. या आसनाने पचन सुधारते आणि पोटा संबंधित असलेल्या समस्या दूर होतात. तसेच मुरुमांच्या समस्यांपासून सुद्धा सुटका होते.

५. उत्तनासन
हे आसन उभे राहून करायचे असल्याने त्याने चेहऱ्यावरील रक्त प्रवाह सुरळीत होतो. ज्याने त्वचा उजळ होण्यास मदत होते. हे आसन त्वचेच्या पेशी तयार करण्यास मदत करते.

६. प्राणायाम
शरीरातील उष्णतेमुळे मुरुमांची समस्या उद्भवते ज्याचा परिणाम त्वचेवर होते. प्राणायाम शरीर थंड करते. तेजस्वी त्वचेसाठी, अनुलोम-विलोम, शीतली प्राणायाम आणि कपालभाती प्राणायाम केले पाहिजे. त्याने नाडीत शुद्ध प्राणवायू प्रवाहित होतो आणि त्वचेला चमक प्राप्त होते.