‘आरोप चांगला आहे’ ; असे का म्हणाले प्रकाश आंबेडकर

नेमका कोण्ही केला आहे आरोप वाचा सविस्तर

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – अकोला, नागपूर, मुंबई या चार जागा शिल्लक आहेत. मी आज रात्री विचार करतोय कुठली जागा लढायची. उद्या सकाळपर्यंत आम्ही ठरवणार आहोत. असे म्हणत कुठली जागा लढायची आहे हे स्पष्ट होईल असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

तर सोलापुरात काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी, जे भाजप संविधान बुडवण्याचं काम करतंय त्यांना तुम्ही मदत करताय असा आरोप केलाय, असा प्रश्न विचारताच त्यांनी ‘आरोप चांगला आहे’ असे उत्तर देत ‘ही वेळ उत्तर देण्याची नसून आमने सामने उत्तर देऊ’ असे ते म्हणाले. आज लातुर येथे पत्रकारांशी संवाद केला त्या वेळी ते बोलत होते.

प्रकाश आंबेडकर यांनी आज लातूर येथे गोपाळ बुरबुरे यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली. बहुजन वंचीत विकास आघाडीचे बुरबुरे स्टार प्रचारक म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी प्रत्रकार परिषदेत सांगितले.