शिवसेनेनं प्रश्न उपस्थित न केल्यास केंद्र सरकार करेल मनमानी : प्रकाश आंबेडकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे दिला आहे. हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गैरविश्वास दाखवला आहे. आता शिवसेनेने याबाबत केंद्राला प्रश्न विचारले नाही तर केंद्र सरकार मनमानी करेल असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनशी बोलत होते.

भीमा कोरेगाव प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे म्हणजेच एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी जोर धरत असतानाच केंद्र सरकारने अचानक निर्णय घेत हा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे म्हणजेच एनआयए कडे वर्ग केला. हे करण्यापूर्वी राज्य सरकारला विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्य सरकारला वेगळा तपास किंवा चौकशी करता येणार नाही.

यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सर्व उघड करत आहेत. त्यांचे आम्ही स्वागत करतो. स्वत:ची चमडी वाचवण्यासाठी केंद्राकडून प्रयत्न केले जात आहेत. या प्रकरणाशी ज्यांचा संबंध नाही ते तुरूंगात सडत राहणार का ? या प्रकरणाची अर्धी कागदपत्रे न्यायालयात आहेत. मुख्यमंत्र्यांवर केंद्राकडून गैरविश्वास दाखविण्यात आला असून दोन यंत्रणांच्या भांडणात ज्यांना आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे त्यांचे काय होणार ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –