उत्तर प्रदेशात ट्रकला कारची धडक, राजस्थानातील 9 जणांचा मृत्यु

प्रतापगड : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव जात असताना समोरुन आलेल्या ट्रकला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जात कारने जोरात धडक दिली. या अपघातात कारमधील ९ जणांचा जागीत मृत्यु झाला असून एकच जखमी झाला आहे.

नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात शुक्रवारी सकाळी घडला. राजस्थानमधून हे सर्व जण एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बिहारमधील भोजपूरला जात होते. कारमध्ये एकूण १० जण होते. त्यांनी लॉकडाऊनच्या काळात पाळायचे कोणतेही प्रवासातील नियमांचे पालन केले नव्हते. राजस्थानवरुन ते प्रतापगड जिल्ह्यात आले होते.

नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोरुन ट्रक येत असताना वेगाने जाणार्‍या या कारने रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला जाऊन ट्रकला वेगाने धडक दिली. त्यात कारचा चक्काचुर झाला. कारमधील ९ जण जागीच ठार झाले असून एका जखमीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.