परमेश्वरा हे काय चाललंय रे ? प्रविण तरडे ‘भावूक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतने त्याच्या मुंबईतील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनाचे वृत्त समोर येताच त्याच्या चाहत्यांसोबतच अनेक सिलिब्रिटी, राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. यातच काही मराठी कलाकारांचाही समावेश आहे. अभिनेता, दिग्दर्शक प्रविण तरडे याने फेसबुक पोस्ट शेअर करत सुशांतसिंह राजपूतला आदरांजली अर्पण केली आहे.

प्रविण तरडे यांनी आपल्या फेसबुक पेजवर फोटो शेअर करत म्हटले की, परमेश्वरा हे काय चाललंय रे.. असं का ? या सोबत सुशांतसिंह राजपूतचा फोटो शेअर केला आहे. तर ट्विटमध्ये म्हटले आहे की, हे दुःख मोठं आहे .. आत्महत्ये पासून सुटके साठी तु छिछोरे दिलास मग आज तूच असा का गेलास ..? I hate you Sushant bhai.

दरम्यान, सुशांतसिंह राजपूतच्या निधनामुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. अद्याप त्याच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालं नसून त्याने नैराश्यात येऊन हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, पोलीस पुढील तपास करत आहेत. काय पो छे, शुद्ध देशी रोमांस, पीके, डिटेक्टिव ब्योंमकेस बक्सी, एम.एस.धोनी. द अनटोल्ड स्टोरी, रबता, चंदा मामा दूर के, केदारनाथ या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका केल्या आहेत. यातील एम.एस. धोनी हा चित्रपट प्रचंड गाजला होता.