13 वर्षाच्या गरोदर मुलीवर 6 जणांचा सामुहिक बलात्कार, ‘तिनं’ उडी मारून दिला जीव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तेरा वर्षाच्या एका प्रेग्नन्ट मुलीला बंधक बनवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्काराच्या घटनेनंतर शुक्रवारी मुलीने घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉक मधील घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुलीने आत्महत्येच्या आधी आपल्या मित्राला मेसेज केला होता ज्यामध्ये ती म्हणते, मी जाणारच आहे, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. एका महिन्याआधी ही मुलगी प्रेग्नन्ट झाली होती. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार मुलीने आपल्या सोशल मीडियावर सुद्धा याबाबत अनेक पोस्ट टाकल्या होत्या. याधील एका पोस्टमध्ये ती म्हणते, जर मी प्रेग्नन्ट नसते तर आत्महत्येचा निर्णय या आधीच घेतला असता.

मृत व्यक्तीच्या आईने गँगरेप बद्दलची माहिती पोलिसांना दिली त्यात त्या म्हणतात अकरा नोव्हेंबरच्या रात्री मुलीला एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवण्यात आले होते आणि तेथेच तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी लवकर तपास करून यांमधील दोन आरोपींची ओळख पटवून घेतलेली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की मुलगी त्या रात्री संशयितांना भेटण्यासाठी गेली होती.

Visit : Policenama.com