9 महिन्यांची गर्भवती, 28 KM पायपीट करून पोहोचली रुग्णालयात

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. जेथे एका गर्भवती आदिवासी महिलेला रुग्णालयात पोहोचण्यासाठी 28 किमी लांब चालत जावे लागले. ही घटना भामरागड तहसीलची आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड हा दुर्गम ग्रामीण भाग आहे. या गावातली रोशनी पोदाडी ही महिला गर्भवती होती. मुलाला जन्म देण्यासाठी तिला रुग्णालयात जायचे होते. परंतु गावाच्या जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र लाहिरी येथे होते. जे सुमारे 28 किलोमीटर अंतरावर होते. प्रवास करण्याचे कोणतेही साधन नसल्यामुळे रोशनी आणि तिच्या कुटुंबियांनी हा मार्ग पायी पार करण्याचा निर्णय घेतला.

रोशनी तिच्या कुटूंबासह पावसात नदी ओलांडत मोठ्या अडचणीने रुग्णालयात पोहोचली. तपासणीनंतर तिला हेमलकसा येथील लोक बिरादरी रुग्णालयात नेण्यात आले. जेथे रोशनीने एका मुलीला जन्म दिला. प्रसूतीनंतर आदिवासी महिला पुन्हा 28 किलोमीटर जंगल आणि नदी पार करत आपल्या बाळासह आपल्या घरी परतली.

या भागास मुख्य प्रवाहाशी जोडणे फार कठीण आहे. कारण येथे जाण्यासाठी कोणतेही साधन नाही. ज्यामुळे या महिलांना गरोदरपणात घ्यावयाच्या खबरदारीबाबत फारसे माहित नसते. आशा कर्मचारी आदिवासींना रुग्णालयात प्रसूतीसाठी येण्यास प्रोत्साहित करतात. ज्यामुळे आई आणि मुलास कोणतीही समस्या उद्भवू नये.

बरीच सरकारे आली व गेली पण आजपर्यंत येथे रस्ता बनलेला नाही. स्वयंसेवी संस्था या भागातील मार्ग आणि वाहतुकीची साधने यासंदर्भात प्रयत्न करीत आहेत. परंतु अद्यापपर्यंत सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. ज्यामुळे येथे राहणाऱ्या लोकांना आरोग्य सुविधा आणि इतर महत्वाच्या गोष्टींसाठी सामना करावा लागत आहे.