कामाची गोष्ट ! फक्त एका OTP नं ‘प्रीपेड’ नंबर होणार ‘पोस्टपेड’ अन् Postpaid होईल Prepaid

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   लवकरच भारतातील टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना पोस्टपेड आणि प्रीपेड बंद करण्याचा पर्याय देणार आहे. याचा अर्थ ग्राहक सोप्या पद्धतीने प्रीपेड कनेक्शनला पोस्टपेड आणि पोस्टपेड कनेक्शनला प्रीपेड कनेक्शनमध्ये बदल करु शकतील. त्यासाठी ग्राहकांना फक्त एका ओटीपीची (OTP) गरज भासणार आहे.

CNBC कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या ट्विटमध्ये एजन्सीने सांगितले की, याबाबतच्या सुधारित मार्गदर्शक सूचना दोन आठवड्यात समोर येतील. भारतात पोस्टपेड वरुन प्रीपेड करण्यासाठी खूप विलंब लागतो. CNBC च्या ट्विटमध्ये लिहण्यात आलं की, प्रीपेड आणि पोस्टपेड कनेक्शन बंद करण्याची प्रक्रिया पुढील दोन आठवड्यात सुधारित करण्यात येईल. ट्राय कडून मार्गदर्शक सूचना ऑपरेटरसाठी लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील. तसेच पुढील दोन महिन्यात ग्राहकांना एक नवीन पर्याय खुला होईल.

फॉर्म भरण्याची गरज नाही

प्रीपेड ग्राहकांना ओटीपीच्या माध्यमातून व्हेरिफाय करावं लागणार आहे. त्याकरता आधी सारखं फॉर्म भरण्याची गरज पडणार नाही. एकदा ओटीपी व्हेरिफिकेशन केल्यानंतर ग्राहकांना बिलिंग पत्ता ऑपरेटरच्या वेबसाईटवर अपलोड करावा लागणार आहे. तसेच ऑपरेटरच्या स्टोरवर गेल्यानंतर अॅप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ग्राहकांना सुटका मिळणार आहे. आता ग्राहकांना पोस्टपेड सिम घरी येण्याची वाट बघावी लागणार नाही. अनेक ग्राहक पोस्टपेड सर्विस केवळ वापर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी सोपा पर्याय आहे.

ऑनलाइन बुकिंगचा पर्याय

वोडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल ग्राहकांना प्रीपेडवरुन पोस्टपेड वर करण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्याचा पर्याय दिला जातो आहे. एकदा ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी घरी येतात. बाकी प्रक्रिया पूर्ण करतात. नवीन प्रक्रियेसाठी कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. पुढील महिन्यात यासंदर्भातील माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.