‘नेपोटीजम’वर बोलताना प्रियंका चोपडानं दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता घराणेशाहीचा मुद्दा जोरावर आहे. अनेकजणांचं म्हणणं हे की, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी इंडस्ट्रीत टिकणं काही लोक मुश्किल करत आहेत. इतकंच नाही तर इतरही अनेक लोक बोलते झाले आहेत आणि आपले इंडस्ट्रीतले अनुभव सांगत आहेत. बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा हिनंही नपोटीजमवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यासाठी हे खूप कठिण होतं. मी इथं कोणाला ओळखत नव्हते. मी जेव्हा इथं पाऊल टाकलं तेव्हा प्रत्येकजण इथं एकमेकांचे चांगले मित्र होते असं ती म्हणाली आहे. प्रियंकाचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होत आहे.

व्हिडीओत प्रियंका म्हणते, “मी जास्त करून लोकांपासून दूर रहात असे. माझं नेटवर्क एवढं काही खास नव्हतं. मी जास्त पार्ट्यांनाही जात नव्हते. माझ्यासाठीही हे थोडं अवघड होतं. परंतु मी सत्याचा स्विकार केला आणि ठरवलं की, मी याला घाबरणार नाही.” हेच कारण आहे की, आज ती एवढी सक्सेसफुल झाली आहे.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव असेल. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अ‍ॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे. असंही म्हटलं जात आहे की, हॉलिवूडच्या मॅट्रीक्स 4 या सिनेमातही ती काम करण्याची शक्यता आहे.