प्रियंका गांधीनं समजवली ‘क्रोनॉलॉजी’, म्हणाल्या – ‘तरूणाई मैदानातच थांबणार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. प्रियांका गांधी यांनी ट्विट करत क्रमवारी सांगितली आहे. प्रियांका गांधी म्हणाल्या, मोदी सरकारने कितीही प्रयत्न करुद्या परंतु देशाची तरुणाई मैदानात उभी राहील.

प्रियांका गांधी यांनी ट्विट केले आहे ज्यामध्ये त्या म्हणतात, क्रमवारी समजून घ्या तुम्ही, पहिल्यांदा ते तुम्हाला दोन कोटी नोकऱ्यांचा वादा करणार मग ते सरकार स्थापन करणार त्यानंतर ते तुमचे विद्यापीठ बरबाद करणार त्यानंतर ते देशाचे संविधान बरबाद करणार त्यानंतर तुम्ही आंदोलन करणार आणि ते तुम्हालाच वेडे बोलणार. परंतु तरुणाई मैदानात जाऊन लढणार.

अशा बाबतचा क्रम आपल्या ट्विटमध्ये टाकत प्रियांका गांधी यांनी आंदोलनासाठी तरुणाई मैदानात जाऊन लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दोन दिवसांपूर्वी देखील प्रियांका गांधी यांनी ट्विट करत भारतीय संविधानाला वाचवण्याचे आवाहन केले होते. त्यांनी ट्विट करत म्हंटले होते की, हा देश एक चांगले नाते हे, चांगले स्वप्न आहे. ही माती कष्टाची आहे. संविधान आमची शक्ती आहे. देशात फूट पाडून राजकारण करण्यापासून देशाला वाचवायचे आहे. अशा प्रकारचे ट्विट प्रियांका गांधी यांनी केले आहे.

युपी प्रशासनाकडून सीएए विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत प्रियांका गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच योगी सरकारने केलेल्या कारवाईमुळे प्रियांका गांधी यांनी योगी सरकारची कोंडी देखील केली होती. प्रियांका गांधी या पुन्हा एकदा लखनऊचा दौरा करणार आहेत. काँग्रेस स्थापना दिनाच्या वेळी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये प्रियांका गांधी हजेरी लावणार आहेत.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/