न्यूयॉर्कमध्ये असलेल्या ‘प्रियंका-निक जोनास’नं PM Cares फंडासहित अनेक संस्थांना दिलं ‘डोनेशन’ !

पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी प्रियंका चोपडा भलेही न्यूयॉर्कमध्ये राहते तरीही तिचं हृदय मात्र कायम भारतासाठीच धडकतं. परदेशात राहूनही प्रियंकानं भारतात सुरु असलेल्या कोरोनाच्या लढाईत मदतीचा हात दिला आहे. प्रियंका चोपडा आणि तिचा पती निक जोनासनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अपीलवर पीएम केअर्स फंडात मदतीचा हात पुढे केला आहे.

प्रियंका चोपडानं काही वेळापूर्वीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि डोनेशनविषयी माहिती दिली आहे. प्रियंकानं आपल्या पोस्टमध्ये लिहलं की, “जगातील अनेक लोकांना आज आपल्या मदतीची गरज आहे. हे माझ्यासाठी आणि निकसाठी गरजेचं होतं की, आम्ही अशा संस्थांना डोनेट करू ज्या गरीब, बेघर लोकांसाठी आणि डॉक्टरांच्या मदतीसाठी काम करत आहेत, ज्या मुलांचं पोट भरण्याचं काम करत आहेत, ज्या म्यझिक आणि एंटरटेमेंट इंडस्ट्रीची मदत करत आहेत. त्यांना तुमच्याही आधाराची गरज आहे. आम्ही तुम्हाला डोनेट करण्यासाठी सांगत आहोत. कोणतीही रक्कम लहान नसते मग तो एक डॉलर करा असेना. आपण सोबत मिळून बदल घडवू शकतो.

https://www.instagram.com/p/B9adYIIh-jY/

प्रियंकानं या पोस्टमध्ये सांगितलं आहे की, तिनं खूप साऱ्या संस्था आणि एनजीओंना मदत केली आहे. प्रयिंकानं युनिसेफ, गुंज, डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर, पीएम केअर्स फंड अशा अनेकांसाठी डोनेट केलं आहे. प्रियंकाच्या आधी भारतात अनुष्का शर्मा, विराट कोहली, करण जोहर, वरुण धवन, भूमी पेडणेकर अशा अनेक कलाकारांनी डोनेशन दिलं आहे. अक्षयनं तर पीएम केअर्स फंडात 25 कोटी डोनेट केले आहेत.

https://www.instagram.com/p/B8lzIJuhZNl/

https://www.instagram.com/p/B8NYVmTBVoa/

https://www.instagram.com/p/B7zbDmsh6P3/

https://www.instagram.com/p/B7zbJkHh1GH/

https://www.instagram.com/p/B7uOx1yB6e0/

https://www.instagram.com/p/B7UZW53BgXL/

https://www.instagram.com/p/B7FfSb5By46/

https://www.instagram.com/p/B7AFmAzBTro/

https://www.instagram.com/p/B694EtOhkRg/

https://www.instagram.com/p/B61Fyx3haFv/