उस्मानाबाद : उपनिरीक्षक पांडुरंग माने यांना केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे दिला जाणारे आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर

पोलीसनामा ऑनलाइन – उस्मानाबाद पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग माने यांना केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे दिला जाणारे आंतरिक सुरक्षा सेवा पदक नुकताच जाहीर झाले आहे. माने यांनी गडचिरोली येथे आँगस्ट २०१४ ते आँगस्ट २०१७ या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

उपनिरीक्षक पांडुरंग माने हे सध्या उस्मानाबाद पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखेत नेमणुकीस आहेत. त्यांनी गडचिरोली येथे नक्षलवाद्यांविरोधात कारवाया करून तेथील जनतेमध्ये पोलिसांच्या विषयी विश्वास निर्माण केला. तसेच स्थानिक नागरिक आणि पोलीस यांच्यातील संबंध सुधारत एक आपुलकीचे नाते निर्माण केले.

त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची केंद्रीय गृह मंत्रालयाने दखल घेतली आहे. पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग माने यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर केले आहे. उस्मानाबाद पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तर पोलीस दल व नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.