घरात ‘या’ ठिकाणी ठेवू नका श्री गणेशाची मुर्ती, होतं ‘धन’ अन् ‘संपत्ती’चं नुकसान, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सनातन धर्मात सर्वप्रथम श्री गणरायाची पूजा करण्याचा नियम आहे. कोणत्याही पूजेची सुरूवात श्री गणेशाच्या पूजेसोबत होते. जो भक्त श्री गणरायाची श्रद्धापूर्वक पूजा-उपासना करतो, त्याच्यावरील सर्व संकटे दूर होतात. सोबतच घरात सुख, शांती आणि समृद्धीचे आगमन होते. मात्र, श्री गणेशाची पूजा करताना विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जर त्यांच्या पूजेत एखादी चूक झाली, तर ते त्या व्यक्तीसाठी अशुभ मानले जाते. याशिवाय श्री गणरायाची मूर्ती खरेदी करणे आणि स्थापना करतेवेळी सुद्धा विशेष काळजी घेतली पाहिजे.

याविषयी खास माहिती जाणून घेवूयात –

– घरात श्री गणरायाची मूर्ती तेव्हाच स्थापन करा, जेव्हा तुम्ही रोज त्यांची पूजा आणि प्रार्थना करू शकता. जर हे तुम्हाला शक्य नसेल तर मूर्तीची स्थापना करू नका.

– श्री गणेशाची मूर्ती 18 सेंटीमीटरपेक्षा जास्त ऊंच असू नये. धार्मिक मान्यतेनुसार घरात अशाच आकाराच्या मूर्तीची पूजा करावी.

– ज्या मूर्तीची उजवीकडे सोंड असेल, ती खरेदी करू नका. कारण, या रूपातील गणरायाच्या पूजेचे विशेष नियम आहेत, जे पाळणे सोपे नाही.

– जेव्हा घरात मूतीची स्थापना कराल, तेव्हा मुर्तीचे तोंड मुख्य प्रवेशद्वाराकडे असू द्या.

– शयन कक्षात चुकूनही गणेशमूर्तीची स्थापना करू नका.

– काही लोक जीन्याच्या खाली देवघर बनवतात. असे अजिबात करू नका आणि अशा ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करू नका.

– श्री लक्ष्मीमातेची मूर्ती श्री गणरायाच्या उजवीकडे ठेवा. श्री लक्ष्मीमाता ही आदिशक्ती आहे. यासाठी चुकूनही लक्ष्मीमातेची मूर्ती गणरायाच्या डावीकडे ठेऊ नका.