जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश ! पुलवामा हल्ल्याचा ‘मास्टरमाइंड’ पाकिस्तानी आतंकवादी कारी यासिरचा ‘खात्मा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांना यश आले असून या चकमकीत पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि पाकिस्तानी दहशतवादी कारी यासिरला ठार करण्यात आले आहे.  यासीर काश्मीरमधील जैश ई मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख होता. या चकमकीत त्याचे दोन साथीदारही सुरक्षा दलाने मारले आहेत. शनिवारी ही चकमकी अवंतीपोरा येथे घडली.

IED ब्लास्टचा  तज्ज्ञ : 
दरम्यान, गेल्या वर्षी पुलवामा हल्ल्यात 40 सीएपीएफ सैनिक शहीद झाले होते.  काश्मीरचे आयजी विजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार यासीर हा पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. तसेच  हा खतरनाक दहशतवादी आयईडी स्फोटाचा तज्ञ होता. त्याच्यासोबतच आणखी दोन दहशतवादी ठार झाले ज्यांची  नावे मुसा ऊर्फ अबू उस्मान अशी आहेत. या व्यतिरिक्त बुरहाउद्दीन शेख हे त्राल  येथील रहिवासी होता. हे सर्व दहशतवादी 26 जानेवारी रोजी मोठ्या हल्ल्याची योजना आखत असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती.

दहशतवाद्यांची भरती करायचे:
श्रीनगरच्या चिनार कोर चे लेफ्टनंट जनरल-ऑफिसर-कमांडिंग लेफ्टिनेंट जनरल केजेएस ढिल्लों आणि पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, “त्राल चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा काश्मीर प्रमुख कासी यासिर यासह तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तो गेल्या वर्षी फेब्रुवारी (आयईडी) स्फोट आणि लेथपोरा (आयईडी) स्फोटात सामील होता. अतिरेकी भरती तसेच त्यांना पाकिस्तानमधून नेण्यातही त्यांचा सहभाग होता.

तीन जवान जखमी  : 
गोळीबारात लष्कराचे तीन जवान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आयजीपी म्हणाले की, श्रीनगर किंवा आसपासच्या पोलिसांना आयईडी हल्ल्याची माहिती सतत मिळत होती. त्यांनी सांगितले कि, ‘आम्हाला बुरहान आणि यासिरची नावे माहित होती. त्याचा एक मित्र आणि यासिरचा दुसरा सेनापती मोशे देखील त्याच्याबरोबर होता. आम्हाला खात्री आहे की मृतदेहाची ओळख पटल्यास त्यातील एक यासीर असेल. कारण आमच्या माहितीनुसार ते तिथे हजर होते. यासीर आणि मुसा हे पाकिस्तानी  तर बुरहान स्थानिक रहिवासी होता.

फेसबुक पेज लाईक करा –