पुणे : गुन्हे शाखेकडून खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खूनाच्या प्रयत्नातील फरार असणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने सापळा रचून अटक केली आहे. अक्षय सुनिल पवार ऊर्फ बारक्या (सुतारदरा, कोथरूड) असे अटक केलेल्याची नाव आहे.

गुन्हे शाखेकडून शहरातील पाहिजे गुन्हेगार व सराईत गुन्हेगारांची माहिती काढली जात आहे. दरम्यान युनिट तीनच्या पथकाला माहिती मिळाली कि खुनाच्या गुन्ह्यात फरार असनारा अक्षय हा सुतारदरा भागात आला आहे.

त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहा. पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, उपनिरीक्षक संजय गायकवाड, स. फौ. किशोर शिंदे, स. फौ. अनिल शिंदे यांच्या पथकाने पकडले. अक्षय याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा हा दाखल आहे. यानंतर तो पसार झाला होता.

Visit : Policenama.com