Pune Aundh Crime | पुण्यातील औंध परिसरात थरार ! गोळीबार करून खूनाचा प्रयत्न केल्यानंतर गोळीबार करणार्‍याने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आकाश जाधव याच्यावर अनिल ढमालेने गोळीबार केला. त्यामध्ये आकाश हा गंभीर जखमी झाला असून त्यास ज्युपिटर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गोळीबार केल्यानंतर ढमालेने पुढे येऊन स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. (Attempt To Murder)

हा सर्व प्रकार आर्थिक देवाण-घेवाणीमधून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. व्यावसायिक वादातून ढमालेने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अधिकृतरित्या माहिती मिळणे बाकी आहे. (Pune Suicide Case)

घटनेची माहिती मिळाल्यानंतर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासत आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती रिक्षा चालकाने पोलिसांना दिली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा
Pune Nirbhay Bano Sabha Rada | पत्रकार निखील वागळेंच्या कारवर हल्ला केल्याप्रकरणी पर्वती पोलिसांकडून दिपक पोटे, गणेश घोष, गणेश शेरला, बापु मानकर, स्वप्नील नाईक, प्रतीक देसरडा, दुशांत मोहोळ, दत्ता सागरे, गिरीश मानकर आणि राहुल पायगुडे यांना अटक

पुणे : शुल्क कारणावरुन फळविक्रेत्याला दगडाने मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल

डंपरचे चाक डोक्यावरुन गेल्याने महिलेचा मृत्यू, आळंदी येथील घटना

Pune Wanwadi Crime | पुणे : फेसबुकवर मैत्री, प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार

पुणे : निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या हत्येच्या प्रयत्नातील आरोपीला काही दिवसातच जामीन मंजूर

पुणे : रस्त्यालगत लघुशंका केल्याच्या कारणावरुन वार, दोघांना अटक