मोटार विक्रीच्या बहाण्याने हॉटेल व्यवसायिकाची ‘फसवणूक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कार घेऊन देण्याच्या बहाण्याने हॉटेल व्यवसायिकाची ३ लाख ३५ हजारांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. २८ जानेवारी ते २ फेबु्रवारी कालावधीत गाडीतळमध्ये घडली आहे.

याप्रकरणी प्रशांत पाटील (वय २६, रा. तिवटगाळ, उदगीर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रफुुल्ल प्रभाकर उबाळे यांच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत उदगीरचे रहिवाशी आहेत. ते हॉटेल व्यवसायिक आहेत. त्यांना जुनी मोटार खरेदी करायची होती. त्यासंदर्भात त्यांच्या एका मित्राने हडपसरमधील मोटार खरेदी-विक्री करणाऱ्या प्रफुल्लचा मोबाईल क्रमांक दिला. त्यानुसार फोन केल्यानंतर प्रफुल्लसह दोघांनी प्रशांत यांना कार पाहण्यासाठी हडपसर परिसरात बोलावून घेत पाच हजारांची आगाउ रक्कम घेतली. त्यानंतर विविध कागदपत्रांसह मोटार ताब्यात देण्यासाठी ३ लाख ३५ हजार रुपये टप्प्याटप्प्याने स्वीकारले. मात्र, रक्कम घेतल्यानंतरही प्रशांत यांना कार न देता फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बी. जाधव अधिक तपास करीत आहेत.