Pune Chinchwad Bypoll Election | वंचितचा अपक्ष राहुल कलाटेंना पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी वाढवलं मविआचं टेन्शन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Chinchwad Bypoll Election | चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. भाजपच्या अश्विनी जगताप (BJP Ashwini Jagtap), राष्ट्रवादीचे नाना काटे (NCP Nana Kate) आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या तिरंगी लढत होत आहे. या निवडणुकीत मनसेने (MNS) भाजपला पाठिंबा दिला आहे. तर वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर वंचितने चिंचवड पोटनिवडणुकीत (Pune Chinchwad Bypoll Election) अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Independent Candidate Rahul Kalate) यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहिर केले आहे. प्रसिद्धपत्रक काढून त्यांनी ही माहिती दिली आहे.

 

काय म्हटले प्रसिद्धीपत्रकात?
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची दुरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे) बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूकी संदर्भात चर्चा झाली. कसबा पोटनिवडणूक काँग्रेस (Congress) लढत आहे असं दिसतंय. परंतु काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडून अजूनही वंचित बहुजन आघाडीकडे कसबा मतदारसंघात (Pune Kasba Peth Bypoll Election) पाठिंबा द्यावा असे विनंती पत्र आलेले नाही. आणि म्हणून कसबा पोटनिवडणूकी संदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही.(Pune Chinchwad Bypoll Election)

 

राष्ट्रवादीकडून खुलासा नाही
पहाटेच्या शपथविधी नंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले होते की हा त्यांच्या पक्षाचा निर्णय होता आणि वरिष्ठांनी तसे आधीच ठरवले होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुद्धा पहाटेच्या शपथविधी संदर्भात खुलासा केलेला आहे आणि त्यामध्ये सरकार बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते आणि अध्यक्ष यांचाही आशिर्वाद होता असे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बीजेपी बरोबर जाणार नाही असा कुठेही खुलासा केलेला नाही.

2019 मध्येही राहुल कलाटेंनाच पाठिंबा होता
पिंपरी चिंचवड मध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता.‌ आणि त्यांनी 1 लाख 12 हजार मते त्यावेळी घेतली होती. राहुल कलाटे हे शिवसेनेचे (Shivsena) सभागृहाचे नेते आहेत. म्हणून ही जागा शिवसेनेने लढवावी आणि राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात यावी असा आमचा आग्रह होता. परंतु तसे घडले नाही.

 

विचार करुन कलाटेंना पाठिंबा
गौप्यस्फोटामुळे महाविकास आघाडी मध्ये परिस्थिती बदललेली आहे. वंचित बहुजन आघाडी पूर्ण विचार करून बीजेपीला पिंपरी चिंचवड मतदारसंघात कोण थांबवू शकले तर राहुल कलाटे थांबवू शकतात या मताला आली आहे.
वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणी एकमताने राहुल कलाटे यांच्या पाठीशी उभे राहील.
यादृष्टीने पाठींबा देऊन निवडून आणण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड मधील मतदारांना वंचित बहुजन आघाडी करत आहे.
हे प्रसिद्धीपत्रक वंचित बहुनज आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर (Rekha Thakur) यांनी प्रसिद्ध केले आहे.

 

वंचित बहुजन आघाडीने राहुल कलाटे यांना पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
राहुल कलाटे यांना वंचितचा पाठिंबा मिळाल्याने महाविकास आघाडीची चिंचवडमध्ये धाकधूक वाढण्याची शक्यता आहे.

 

Web Title : – Pune Chinchwad Bypoll Election | prakash ambedkar led vanchit bahujan aghadi support rahul kalalte in chinchwad bypoll election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rana Daggubati | ‘राणा नायडू’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित; पहिल्यांदाच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील काका पुतण्याची जोडी प्रेक्षकांसमोर

Police Inspector Transfer | नाशिक परिक्षेत्रामधील 7 पोलिस निरीक्षकांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या

Chhagan Bhujbal | उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची घाई केली नसती तर…, छगन भुजबळांचे मोठे विधान (व्हिडिओ)