Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 196 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. शनिवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 लाखांच्या वर गेली असून, आजपर्यंत पुणे शहरात 5 लाख 251 पुणेकरांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 4 लाख 89 हजार व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. पुणे शहरात ((Pune Corona) दैनंदिन रुग्णांच्या (New patient) संख्येत घट झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

आज पुणे शहरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे.
रुग्ण संख्येत घट झाल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 171 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे.
तर 196 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरामध्ये आजपर्यंत 33 लाख 31 हजार 038 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
त्यापैकी 5 लाख 251 जण कोरोना बाधित (Corona-infected patients) आढळून आले आहे.
यापैकी 9018 जणांचा मृत्यू झाला असला तरी, यातील बहुतांश रुग्ण हे इतर आजारांनी ग्रस्त होते.
आजपर्यंत 4 लाख 89 हजार 681 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
सध्या शहरामध्ये सक्रिय (Active patient) रुग्णसंख्या 1 हजार 552 इतकी आहे.

 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Health Department of Pune Municipal Corporation) दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.25) 171 नवीन कोरोनाबाधित (Pune Corona) आढळून आले आहेत. आज विविध तपासणी केंद्रावर 8 हजार 285 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.
आज दिवसभरात 196 कोरोनामुक्त झाले आहेत तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
यापैकी 4 पुणे शहरातील आहेत तर 3 जण पुण्याबाहेरील आहेत. शहरामध्ये 185 गंभीर रुग्ण असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 237 इतकी आहे.

 

Web Title : Pune Corona | Discharge of 196 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anti Corruption | 20 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Girlfriend On Rent | इथं भाड्याने मिळतात ‘गर्लफ्रेन्ड’, तुम्ही सुद्धा करू शकता ‘हायर’ !

Ajit Pawar | नगरपरीषदेच्या इमारतीवरील अक्षरांचा रंग गेल्याचे पाहून अजित पवार संतापले; अवघ्या 2 तासात ‘चेंज’

Maharashtra Rains | मुंबईसह राज्यात रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता