Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 287 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corona | पुणे शहरामध्ये शनिवारी (दि.11) 134 कोरोनाबाधित (Pune Corona) आढळून आले आहेत. तर 287 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. आज विविध तपासणी केंद्रावर 6 हजार 879 संशयितांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये 134 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (positive Report) आला आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या कमी झाली आहे.

पुणे शहरातील (Pune City) सक्रिय रुग्णांची संख्या ही 2 हजार 067 इतकी झाली आहे. आज दिवसभरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 1 रुग्ण पुण्याबाहेरील आहे. तर 4 रुग्ण शहरातील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये 8 हजार 973 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आरोग्य विभागाने (Health Department) दिली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या ही 215 इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 287 इतकी आहे.
शहरात आत्तापर्यंत 32 लाख 27 हजार 336 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.
यापैकी 4 लाख 97 हजार 987 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
तर यापैकी 4 लाख 86 हजार 947 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

पुणे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 97.55 टक्के

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 24 हजार 823 रुग्णांपैकी 10 लाख 97 हजार 228 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
ॲक्टिव्ह रुग्ण 8 हजार 920 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 675 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.66 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.55 टक्के आहे.

Web Titel :- Pune Corona | Discharge of 287 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murder In Nagpur | पोलीस ठाण्यात मोर्चा जाताच उलगडलं खूनाचं रहस्य, दोन जणांना केली अटक

Gujarat CM | गुजरातचे नवे ‘CM’ कोण?, चंद्रकांत पाटील की नितीन पटेल? चर्चेला उधाण

Modi Government | नोकरीचे टेन्शन संपले ! मोदी सरकारच्या योजनेत अर्ज करून लवकर कमवा जास्त पैसे, जाणून घ्या