Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात 2197 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) हद्दीमध्ये मागील महिन्यात कोरोनाचे (Pune Corona Update) रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले. मात्र आता शहरातील रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. रुग्ण कमी होत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 700 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2197 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

पुणे शहरात आजपर्यंत 44 लाख 23 हजार 970 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे.
यामध्ये 6 लाख 55 हजार 996 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Update) आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 39 हजार 181 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 06 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 02 तर हद्दीबाहेरील 04 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 326 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली होती.
मात्र आता ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. पुणे शहरामध्ये सध्या 7 हजार 489 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
यामध्ये 204 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर 35 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 21 रुग्ण आहेत.
एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपैकी 8.87 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6 हजार 448 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

 

Web Title :- Pune Corona Update | In the last 24 hours 2197 patients in Pune city are corona free find out other statistics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा