Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’मुळं तब्बल 45 जणांचा मृत्यू, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. स्थानिक प्रशासन देखील दिवसरात्र एक करून व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनामुळं तब्बल 45 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, समाधानाची बाब म्हणजे आज दिवसभरात 1188 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 84496 वर जावून पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 67 हजार 777 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं 2033 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आज दिवसभरात कोरोनाचे 1101 नवे पॉझिटिव्ह शहरात आढळून आले आहेत. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 14686 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकूण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 802 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 487 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत.