Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’मुळे 6 जणांचा मृत्यू तर 350 नवे पॉझिटिव्ह, महापालिकेकडून 18 जून पर्यंतची प्रभाग निहाय आकडेवारी जाहीर, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसचं थैमान चालूच आहे. पुणे शहरातील कोरोना व्हायरसचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनामुळं 6 जणांचा बळी गेला आहे तर तब्बल 350 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पुण्यात आतापर्यंत तब्बल 493 जणांचा कोरोनामुळं बळी गेला आहे तर शहरातील एकुण कोरोनाबाधितांचा आकडा आता 11465 वर पोहचला आहे.

पुणे शहरात सध्या 3909 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 7063 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात 157 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ते कोरोनाबाधित उपचारानंतर बरे झाले आहेत. आज दिवसभरात आढळून आलेल्या 350 पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये ससून, नायडू आणि इतर खासगी रूग्णालयातील रूग्णांचा समावेश आहे. अ‍ॅक्टीव्ह असलेल्या 3722 रूग्णांपैकी 265 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यापैकी 53 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहे. पुणे शहरात आतापर्यंत 493 जणांचा कोरोनामुळं बळी गेला आहे. प्रशासनानं नागरिकांना घराबाहेर पडू नका, अति महत्वाचे काम असेल तर मास्क परिधान करा, सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळा असे आवाहन केले आहे.

जाणून घ्या : पुण्यातील ‘कोरोना’बाधितांची 18 जूनपर्यंची प्रभाग निहाय आकडेवारी

कोरोना व्हायरसचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. दरम्यान, स्थानिक प्रशासन देखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 24 तास प्रयत्नशील आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, बाहेर पडल्यास सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावे असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तरी देखील पुणे शहरातील कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोना रूग्ण उपचारानंतर बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. पुणे महापालिकेने 18 जूनपर्यंची प्रभाग निहाय कोरोनाबाधितांची आकडेवारी जाहीर केली आहे. ती पुढील प्रमाणे.

1. ढोले पाटील रोड
प्रभाग 20- ताडीवाला रोड – ससून हॉस्पीटल – एकूण रूग्ण – 1239 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 169)
प्रभाग 21- कोरोगाव पार्क – घोरपडी – एकूण रूग्ण – 562 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण 149)

2. भवानी पेठ
प्रभाग 17 – रास्ता पेठ – रविवार पेठ – एकूण रूग्ण 275 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 60)
प्रभाग 18 – खडकमाळ आळी – महात्मा फुले पेठ – एकूण रूग्ण – 427 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 68)
प्रभाग 19 – लोहियानगर – कोसवाडी – एकूण रूग्ण 299 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण -75)

3. येरवडा – कळस – धानोरी
प्रभाग 1 – कळस – धानोरी – एकूण रूग्ण – 83 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 32)
प्रभाग 2 – फुले नगर – नागपूर चाळ – एकूण रुग्ण – 186 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 46)
प्रभाग 6 – येरवडा – एकूण रुग्ण – 864 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 175)

4. कसबा- विश्रामबाग वाडा
प्रभाग – 15 – शनिवार पेठ – सदाशिव पेठ – एकूण रुग्ण 98 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 46)
प्रभाग – 16 – कसबा पेठ – सोमवार पेठ – एकूण रुग्ण – 371 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 83)
प्रभाग – 29 – नवी पेठ – पर्वती – एकूण रुग्ण – 660 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 308)

5. शिवाजीनगर – घोलेरोड
प्रभाग – 14 – डेक्कन जिमखाना – मॉडेल कॉलनी – एकूण रुग्ण – 386 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 197)
प्रभाग – 7 – पुणे विद्यापीठ – वाकडेवाडी – एकूण रुग्ण – 532 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 149)

6. बीबवेवाडी
प्रभाग – 28 – सॅलीसबरी पार्क – महर्षी नगर – एकूण – 273 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 65)
प्रभाग – 36 – मार्केट यार्ड – लोअर इंदिरा नगर – एकूण रुग्ण – 275 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 83)
प्रभाग – 37 – अप्पर सुपर इंदिरा नगर – एकूण रुग्ण – 95 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 44)

7. वानवडी – रामटेकडी
प्रभाग – 24 – रामटेकडी – सय्यद नगर – एकूण रुग्ण – 362 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 166)
प्रभाग – 25 – वानवडी – एकूण रुग्ण – 144 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 77)
प्रभाग – 27 – कोंढवा खुर्द – मीठा नगर – एकूण रुग्ण – 278 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 127)

8. धनकवडी – सहकारनगर
प्रभाग – 35 – सहकार नगर – पद्मावती – एकूण रुग्ण – 296 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 105)
प्रभाग – 39 – धनकवडी – अंबेगाव पठार – एकूण रुग्ण – 77 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 34)
प्रभाग – 40 – अंबेगाव दत्त नगर – कात्रज गावठाण – एकूण रुग्ण – 72 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 30)
प्रभाग – 42 – नव्याने अॅड झालेली 11 गावे – एकूण रुग्ण – 14 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 4)

9. हडपसर – मुंढवा
प्रभाग – 22 – मुंढवा – मगरपट्टा सिटी – एकूण रुग्ण – 150 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 61)
प्रभाग -23 – हडपसर गावठाण – सातवाडी – एकूण रुग्ण – 137 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 69)
प्रभाग – 26 – महंमदवाडी – कसूर बाग – एकूण रुग्ण – 81 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 33)
प्रभाग – 42 – नव्याने अॅड झालेली 11 गावे – एकूण रुग्ण – 111 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 43)

10. नगर रोड – वडगावशेरी
प्रभाग – 3 – विमान नगर – सोमनाथ नगर – एकूण रुग्ण – 165 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 59)
प्रभाग – 4 – खराडी – चंदन नगर- एकूण रुग्ण – 111 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 59)
प्रभाग – 5 – वडगावशेरी – कल्याणी नगर – एकूण रुग्ण – 96 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 31)
प्रभाग – 42 – नव्याने अॅड झालेली 11 गावे – एकूण रुग्ण – 35 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 21)

11. सिंहगड रोड
प्रभाग 30 – जनता वसाहत – दत्तवाडी – एकूण रुग्ण – 503 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 329)
प्रभाग – 33 – वडगाव धायरी – वडगाव बुद्रुक – एकूण रुग्ण – 33 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 10)
प्रभाग – 34 – सनसीटी – हिंगने खुर्द – एकूण रुग्ण – 17 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 10)
प्रभाग – 42 – नव्याने अॅड झालेली 11 गावे – एकूण रुग्ण – 19 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 11)

12. कोंढवा – येवलेवाडी
प्रभाग – 38 – बालाजी नगर – राजीव गांधी नगर – एकूण रुग्ण – 65 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 29)
प्रभाग – 41 – कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी – एकूण रुग्ण – 178 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 86)
प्रभाग – 42 – नव्याने अॅड झालेली 11 गावे – एकूण रुग्ण 9 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 7)

13. वारजे – कर्वेनगर
प्रभाग – 13 – एरंडवणा – हॅप्पी कॉलनी – एकूण रुग्ण – 44 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 20)
प्रभाग – 31 – कर्वे नगर – एकूण रुग्ण – 17 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 6)
प्रभाग – 32 – वारजे – माळवाडी – एकूण रुग्ण – 22 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 17)
प्रभाग – 42 – नव्याने अॅड झालेली 11 गावे – एकूण रुग्ण 14 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 7)

14. कोथरूड – बावधन
प्रभाग – 10 – बावधन – कोथरूड डेपो – एकूण रुग्ण – 47 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 32)
प्रभाग – 11 – रामबाग कॉलनी – शिवतीर्थ नगर – एकूण रुग्ण – 90 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 73)
प्रभाग – 12 – मयुर कॉलनी – डहाणुकर कॉलनी – एकूण रुग्ण – 47 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 31)

15. औंध – बाणेर
प्रभाग – 8 – औंध – बोपोडी – एकूण रुग्ण – 272 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 174)
प्रभाग – 9 – बाणेर- बालेवाडी – पाषाण – एकूण रुग्ण – 30 (अ‍ॅक्टीव्ह रूग्ण – 22)

दरम्यान, ही जाहीर करण्यात आलेली आकडेवारी ही 18 जून पर्यंतची आहे.