Pune Crime | दुर्दैवी ! मशीनमध्ये ओढणी अडकल्याने गळफास लागून 21 वर्षीय नवविवाहीतेचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव (Lakhangaon) येथील एक धक्कादायक घटना (Pune Crime) घडली आहे. कडबा कुट्टीच्या मशीनमध्ये ओढणी गुंतून गळफास लागल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू (Died) झाला आहे. ही दुर्देवी घटना मंगळवारी घडली. सोनाली अजय दौंड (Sonali Ajay Daund) (वय 21) असे मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

याबाबत माहिती अशी, लाखनगाव येथील गव्हाळी मळ्यात राहणारी सोनाली दौंड यांचा विवाह 6 महिन्यापूर्वी झाला होता. दौंड कुटुंबियांचा दुग्ध व्यवसाय असून सकाळी सोनाली जनावरांचे खाद्याची कुट्टी करण्यासाठी गोठ्यात गेली होती. त्यावेळी आजूबाजूला कोणी नव्हते. कुटीमध्ये पेंढी घालत असताना पेंढी बरोबर तिचा दुपट्टा आतमध्ये ओढला गेला. दुपट्टाची दोन्ही बाजू आत गेल्याने तिला गळफास बसला. या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू (Pune Crime) झाला आहे.

दरम्यान, सुभाष दौंड (Subhash Daund) हे शेतात मेथीला तन नाशक मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी नवनाथ लक्ष्मण रोडे (Navnath Laxman Road) व वैभव रामदास पडवळ (Vaibhav Ramdas Padwal) यांनी याबाबत माहिती त्यांना दिली. सुनील यांनी सोनाली दौंड याची कडबा कुट्टी मशीन मधून सुटका केली. सोनाली या कुठलीही हालचाल करत नव्हत्या. यानंतर रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, या घटनेबाबत मंचर पोलिसांत (Manchar Police Station) नोंद झाली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस (Pune Crime) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 21 year old newly married woman dies after being strangled machine lakhangaon of manchar police station area pune rural police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Akshara Singh | स्पोर्ट्स ब्रा आणि ब्लॅक शॉट्समध्ये अभिनेत्री अक्षरा सिंहनं केली फ्लॉन्ट फिगर, व्हिडीओ पाहून उडतील होश

Maharashtra Rains | आगामी 5 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता; ‘या’ 13 जिल्ह्यांना हाय ‘Alert’

Gold-Silver Price Today | खुशखबर ! सोने झाले स्वस्त, चांदीही घसरली; जाणून घ्या आजचे नवीन दर

Parambir Singh Absconding | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह तिघांना कोर्टानं केलं फरार घोषित

Thick Thighs-Round Buttocks | मोठ्या मांड्या आणि नाशपती आकारासारख्या लोकांच्या आरोग्यासंबंधी मोठे रहस्य आले समोर; जाणून घ्या

Nagpur Crime | प्रियकराच्या नादात विवाहीतेनं स्वतःच्या हाताने भरल्या संसाराचा केला ‘सत्यानाश’, तरूणासाठी पतीला दिला ‘दगा’ अन्…