Maharashtra Rains | आगामी 5 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता; ‘या’ 13 जिल्ह्यांना हाय ‘Alert’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Maharashtra Rains | अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असून आज (बुधवारी) आणि उद्या (गुरुवारी) मध्य-पूर्व अरबी समुद्रात आणि महाराष्ट्राच्या (Maharashtra Rains) किनारपट्टीवर वादळी वारे वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी 1 ते 2 दिवसात यांची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. याचा परिणाम म्हणजे आगामी 5 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश भागात पाऊस (Rain) कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने IMD (Indian Meteorological Department) वर्तवली आहे.

 

आगामी पाचही दिवस हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) विविध जिल्ह्यांना तीव्र पावसाचा (Maharashtra Rains) इशारा देण्यात आला आहे.
तर,अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. 19 नोव्हेंबरनंतर याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आगामी 5 दिवस किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आजही वा-याची तीव्रता आहे.

Advt.

दरम्यान, आज (बुधवारी) मुंबईसह, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. येत्या 2 ते 3 तासात याठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच, पुढील काही तासांत वाऱ्याची गती आणखी वाढण्याची शक्यता असून वाऱ्यांचा वेग 60 किमी प्रतितास इतका होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

 

Web Title : Maharashtra Rains | gusty wind in arabian sea for next 2 days imd give alert to Mumbai, Pune, Thane, Nashik, Palghar, Ahmednagar, Solapur, Sangli, Satara, Kolhapur, Raigad, Ratnagiri and Sindhudurg Heavy rain is expected in many places in Central Maharashtra and Marathwada including Konkan for next 5 days

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold-Silver Price Today | खुशखबर ! सोने झाले स्वस्त, चांदीही घसरली; जाणून घ्या आजचे नवीन दर

Parambir Singh Absconding | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह तिघांना कोर्टानं केलं फरार घोषित

Monalisa | अभिनेत्री मोनालिसाचा हाॅट अ‍ॅन्ड सेक्सी व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…