Pune Crime | पुण्यातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देण्याच्या बहाण्याने 90 लाखांची फसवणूक, सिंहगड रोड पोलिसांकडून दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील वैद्यकीय कॉलेजमध्ये (Pune Medical College) मुलांना प्रवेश (Admission) मिळवून देण्याच्या आमिषाने दोन डॉक्टरांची तब्बल 90 लाख रुपयांना फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) दोन भामट्यांना नऱ्हे (Narhe) येथून अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.23) दुपारी दोन ते साडेचार या दरम्यान काशिबाई नवले हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज (Kashibai Navale Hospital and Medical College) नऱ्हे येथे घडला आहे.

 

महेंद्र बेदिया एस/ओ धर्मनाथ Mahendra Bedia S / O Dharmanath (वय-31 रा. झारखंड-Jharkhand), करण गौरव एस/ओ रविंद्रकुमार सिन्हा Karan Gaurav S / O Ravindra Kumar Sinha (वय-31 रा. बिहार-Bihar) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत रामचंद्र रखमाजी साळुंके Ramchandra Rakhmaji Salunke (वय-48 रा. नवले मेडिकल कॉलेज स्टाफ क्वार्टर, एम बिल्डींग, पुणे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलीस उप निरीक्षक अमोल काळे (PSI Amol Kale) यांनी दिलेल्या माहितीनुसार,
आरोपींनी डॉ. शिवाजी शेंडगे (Dr. Shivaji Shendge) व डॉ. भास्कर जाधव (Dr. Bhaskar Jadhav) यांना फोन करुन संपर्क साधला.
त्यांना पुण्यातील नऱ्हे येथील काशिबाई नवले हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये (Administrative Department) असल्याचे सांगितले.
तसेच तुमच्या मुलांचे कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन करुन देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
आरोपींनी दोघांकडून प्रत्येकी 45 लाख असे एकूण 90 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली.
कॉलेजचे नाव घेऊन फसवणूक करुन कॉलेजची बदनामी केल्याप्रकरणी रामचंद्र साळुंके यांनी तक्रार दिली आहे.

आरोपी हे काहीही कामधंदा करत नाहीत. ते नऱ्हे येथे राहत असून लोकांना लिंक पाठवून किंवा त्यांना फोन करुन त्यांच्याशी संपर्क साधत होते.
त्यांचे नऱ्हे येथे कॉलसेंटर नसून मुंबईत कॉलसेंटर (Call Center) असल्याची माहिती मिळाली आहे.
त्यानुसार पोलीस तपास करत असल्याचे पोलीस उप निरीक्षक अमोल काळे यांनी सांगितले.

 

Web Title :- Pune Crime | 90 lakh fraud under the pretext of admission in medical college in Pune, Sinhagad Road police arrested two

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uric Acid | ‘यूरिक अ‍ॅसिड कंट्रोल’ करायचे असेल तर उन्हाळ्यातील ‘या’ 5 फ्रूट्सचा डाएटमध्ये करा समावेश

 

Pune News | कामगाराच्या प्रामाणिकपणामुळे बाजारात हरवलेली ‘पट्टी’ शेतकऱ्याला परत

 

NCP Pune | पुण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ! शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी