Pune Crime | सिग्नल का तोडला विचारणा करणार्‍या वाहतूक पोलिसाला बुटाने मारहाण; पुणे-नगर रोडवरील खराडी बायपास चौकातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सिग्नल (Signal) का तोडला अशी विचारणा करणार्‍या वाहतूक पोलीस (Traffic Police) अंमलदाराला एका कारचालकाने पायातील बुट काढून मारहाण (Beating) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी विमानतळ वाहतूक विभागातील पोलीस अंमलदाराने विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३६१/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी बाळकृष्ण जयराम टाळके Balkrishna Jayaram Talke (वय ३२, रा. निओ सिटी सोसायटी, वाघोली) याला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार पुणे-नगर रोडवरील (Pune-Nagar Road) खराडी बायपास चौकात शनिवारी सायंकाळी पाच वाजता घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे खराडी बायपास चौकात वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी चंदननगरकडून हडपसरच्या दिशेने जाणार्‍या वाहतूकीसाठी लाल सिग्नल झाल्याने फिर्यादी यांनी या रोडने जाणार्‍या वाहनांना थांबण्याचा हाताने इशारा केला. तरीही बाळकृष्ण टाळकेला त्याची कार घेऊन सिग्न तोडून काही अंतर पुढे आला. तेव्हा फिर्यादी त्याची गाडी थांबवून बाजूला घेऊन आपण सिग्नल का तोडला असे विचारले.

 

त्याचा राग आल्याने त्याने फिर्यादी यांच्या सरकारी वर्दीची कॉलर पकडून शर्टचे बटण तोडले.
त्यांना शिवीगाळ करुन तुम्हा पोलिसांना खूप मस्ती आली आहे,
असे म्हणत त्याने त्याच्या पायातील बुट हातात घेऊन फिर्यादी यांच्या डोक्यात मारहाण केली.
पोलिसांनी सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याच्या कारणावरुन गुन्हा (FIR) दाखल करुन कारचालकाला अटक केली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक लहाने (Assistant Police Inspector Lahane) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A traffic policeman who asked why the signal was broken was beaten with a shoe; Incident at Kharadi Bypass Chowk on Pune-Nagar Road

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | आमदार माधुरी मिसाळ यांना जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी

Nashik Crime | पतीचा निर्घुण खून करुन पत्नी गेली पळून; दुर्गंधी सुटल्याने झाला उलगडा

Raj Thackeray | मनसेचा मोठा गौप्यस्फोट ! राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना ‘दसरा मेळाव्यावरून दिला होता ‘हा’ सल्ला, मात्र…’