Pune : कुविख्यात तम्मा कुसाळकर गँगच्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, पिस्तुलासह 3 जिवंत काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कुविख्यात तम्मा कुसाळकर गँगच्या गुन्हेगाराला Tamma Kusalkar gang पिस्तुल बाळगत फिरत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. फर्ग्युसन कॉलेजच्या ग्राऊंडवर त्याला पकडले आहे. त्याच्याकडून 1 पिस्तुल व 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.

धनंजय राजेंद्र गावडे (वय 28, रा. शिवाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहरात पाहिजे गुन्हेगार तसेच सराईत गुन्हेगारांची माहिती काधुन त्यांना जेरबंद करण्याचे सूचना दिल्या आहेत.

यादरम्यान गुन्हे शाखा युनिट एकचे पथक गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी सचिन जाधव व आय्याज दद्दीकर याना माहिती मिळाली की, गुन्हेगार धनंजय गावडे हा फर्ग्युसन कॉलेजच्या ग्राऊंडवर थांबला असून, त्याच्याकडे पिस्तुल आहे.

तो हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

त्याची झडती घेतली असता तयाच्याजवल एक पिस्तुल व 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

त्याच्यावर 3 गुन्हे दाखल असून, तो तम्मा कुसाळकर गँगचा सदस्य असल्याचे सांगण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, पोलीस कर्मचारी सचिन जाधव,
शशिकांत दरेकर, सत्ता सोनवणे, अजय थोरात, अमोल पवार व त्यांच्या पथकाने केली आहे.

Also Read This : 

 

Maharashtra Unlock : राज्यात 5 टप्प्यात होणार अनलॉक, मात्र पुण्यात लॉकडाऊन; जाणून घ्या कारण ?

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

 

शिक्षकांसाठी खुशखबर ! TET वैधतेबाबत महत्त्वाचा निर्णय, आयुष्यभर राहणार प्रमाणपत्राची वैधता

 

Nutrients For Women : तंदुरुस्त राहण्यासाठी महिलांनी आहारात ‘या’ 5 पोषक तत्वांचा करावा समावेश, जाणून घ्या

 

Maharashtra Unlock : राज्यात 5 टप्प्यांत अनलॉक, 18 जिल्हे पूर्णपणे Unlock; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती

 

Disinfect Home : ‘कोरोना व्हायरस’च्या इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी अशाप्रकारे करा घर ‘डिसइन्फेक्ट’, जाणून घ्या