Pune Crime | पुण्यात सावरकरांच्या पुतळ्यासमोर फ्लेक्स लावण्यावरुन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील सारसबाग (Sarasbagh) जवळ असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantrya Veer Savarkar) यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेसकडून (Pune Congress) फ्लेक्स लावण्यात आले होते. सावरकरप्रेमींनी हे फ्लेक्स हटवले होते. मात्र आता पुणे पोलिसांनी (Pune Police) याची दखल घेतली आहे. पोलिसांनी महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेसच्या (Maharashtra Youth Pradesh Congress) कार्यकर्त्यांवर गुन्हे (FIR) दाखल केले आहेत. युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील (General Secretary Rohan Suravse Patil) यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे राज्यात पडसाद उमटत आहेत. राज्यातील अनेक भागांतून राहुल गांधी याचा निषेध केला जात आहे. त्यामुळे पुण्यातील काँग्रसेचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सारसबाग जवळ असलेल्या सावरकरांच्या पुतळ्यासमोर माफीवीर आणि राहुल गांधी यांनी दिलेल्या पुराव्याचे फ्लेक्स लावले होते. (Pune Crime)

 

यावरुन भाजप (BJP) आणि काँग्रेस यांच्यात वाद निर्माण झाले. भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस
अधिकाऱ्यांची भेट घेऊन काँग्रेस कार्य़कर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
यानंतर पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात 153, 504, 188 कलमांतर्गत स्वारगेट पोलीस ठाण्यात
(Swargate Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Pune Crime | cases filed against congress workers about sawarkar flex

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MSEDCL | वीजबिल भरण्याबाबत बनावट संदेशाद्वारे आर्थिक फसवणूकीचे प्रकार वाढले; महावितरणने केले ‘हे’ आवाहन

Aaditya Thackeray | ‘मुंबई सोन्याचे अंडे देणारी कोंबडी नाही, आमच्यासाठी जन्मभूमी कर्मभूमी आहे’ – आदित्य ठाकरे

Devendra Fadnavis | “अगर ऐसे ही सिलेक्टीव्ह चीज़े पढ़ते रहोगे तो… “; ट्विट करून घेतला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींचा धडा