Pune Crime | रशियात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक, ओएसिस एज्युकेशनच्या 3 संचालकांविरुद्ध FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | रशियात वैद्यकीय शिक्षण (Medical Education in Russia) घेण्यासाठी गेलेल्या शहरातील दोन विद्यार्थ्यांची 13 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ओएसिस एज्युकेशनच्या तीन संचालकांविरुद्ध (Oasis Education Director) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे. गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेल्या संचालकापैकी एकजण न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) आहे.

 

एज्युकेशन ओएसिस संस्थेचे संचालक सागर साळवी (Sagar Salvi), विक्रांत साळवी (Vikrant Salvi), विद्या आमरे (Vidya Amre) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुभाष वसंतराव जगताप Subhash Vasantrao Jagtap (वय 53, रा. खंडोबा चौक, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. सागर साळवी याला ठाणे येथे दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक (Arrest) करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. (Pune Crime)

 

ओएसिस एज्युकेशन संस्थेचे कार्यालय पादुका चौकातील (Paduka Chowk) श्रीनाथ प्लाझा (Shrinath Plaza) इमारतीत होते. या संस्थेकडून परदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय केली जात होती. फिर्य़ादी यांचा मुलगा रशियातील ओरबर्ग स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी (Orburg State Medical University) येथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी तीन वर्षापूर्वी गेला आहे. फिर्यादी यांनी दोन वर्षाचे 8 लाख 55 हजार रुपये शैक्षणिक शुल्क (Education Fee) आरोपींना भरण्यासाठी दिले. मात्र आरोपींनी पहिल्या सत्राचे पैसे भरून उर्वरित पैशांचा अपहार केला.

फिर्यादी हे पुण्यात आले असता ते संस्थेचा कार्य़ालयात गेले. परंतु कार्यालयाला कुलूप असल्याने त्यांनी आरोपींच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला.
परंतु आरोपींनी फिर्यादी यांना कोणताच प्रतिसाद दिला नाही. जगताप यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
दरम्यान, आरोपींनी एका तरुणीकडून पाच लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने (Senior Police Inspector Arvind Mane)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक यु.के. माने (API U.K.Mane) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Fraud of medical students in Russia, FIR against 3 directors of Oasis Education

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bachchu Kadu | मुख्यमंत्री शिंदे 50 आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार त्याबद्दल बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

Pune Accident | स्कूल बसमधून पडून मदतनीस महिलेचा मृत्यू, शहरात वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू

Jitendra Awhad | “राजीनामा माझ्या बापाकडे दिला आहे, आता पुढे ते ठरवतील” जितेंद्र आव्हाडांचे राहुल नार्वेकरांना प्रतिउत्तर