Pune : पत्नी व मुलांचे 100 तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवण्याची धमकी, FIR दाखल

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – माहेरून पैसे आणत नसल्याने पत्नी व मुलांचे १०० तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हडपसर परिसरात हा प्रकार घडला आहे.
पती सिध्दार्थन व्ही.पी (वय ४२, रा.तंजावरु, तामिळनाडू), पनीर माथोर, वडीवग्गाल व्ही.पी.( वय ६३) यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेचा सिध्दार्थन बरोबर २०१० मध्ये विवाह झाला होता. यानंतर माहेरून पैसे घेऊन ये म्हणून तीचा वारंवार छळ करण्यात येत होता. पतीबरोबर इतर सासरचेही मानसिक व शारीरीक तिचा छळ करत होते. पतीने तीला व मुलांना जीवे ठार मारुन तुमचे १०० तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवीन अशी धमकी दिली.

यानंतर फिर्यादीचा पती तीला व मुलांना सोडून निघुन गेला. मुलांची कोणतीच जबाबदारी त्याने घेतली नाही. घटस्फोट देण्यासाठी तो सातत्याने दबाव टाकत होता. अधिक तपास महिला पोलिस हवालदार बर्वे या करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like