Pune Crime News | पिवळीची पांढरी गाडी करण्यासाठी आरटीओ एजंटकडून साडेसात लाखाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | टुरिस्ट म्हणून नोंदणी (Tourist Vehicle Permit) केलेली चारचाकी कारची नोंदणी बदलून ती सर्वसाधारण कार करण्यासाठी आरटीओतील (Pune RTO Office) प्रक्रिया पूर्ण करुन देण्याच्या नावाखाली ६ जणांची एजंटने फसवणूक केली असून त्यांना साडेसात लाखांचा गंडा घातला आहे. (Pune Crime News)

प्रादेशिक परिवहन विभागात एजंटशिवाय काहीही काम होत नाही, असे सांगितले जाते. आता एजंटच फसवणुक करु लागल्याचे समोर आले आहे.
याबाबत वाघोली (Wagholi) येथील एका ४२ वर्षाच्या नागरिकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३६३/२३) दिली आहे. त्यानुसार एजंट मिलिंद मधुकर भोकरे Milind Madhukar Bhokare (रा. स्वारगेट) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार प्रादेशिक परिवहन कार्यालयात २१जुलै पासूनआतापर्यंत सुरु होता. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद भोकरे हा आरटीओमध्ये एजंट म्हणून काम करतो. फिर्यादी यांना रिनॉल्ड स्काला गाडीची पिवळी नंबर प्लेटची पांढरी करायची होती. त्यासाठी आर टी ओ कार्यालयामधील सर्व प्रक्रिया करुन देतो, असे म्हणून भोकरे याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्या कामासाठी फिर्यादी यांच्याकडून रोख व ऑनलाईन स्वरुपात १ लाख ४५ हजार ६०० रुपये घेतले. मात्र कोणतेही काम करुन दिले नाही. त्यांच्याप्रमाणेच इतर ५ जणांकडून त्याने अशाच प्रकारे पैसे घेऊन ७ लाख ४३ हजार ५५० रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नळकांडे तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Crime News | वर पक्षाच्या खोलीतून सव्वा लाखांचा ऐवज लंपास, दिघी परिसरातील घटना

Pune Pimpri Crime News | ‘जिलब्या गँगला जो कोणी नडणार, त्याची…’ दहशत पसरवणाऱ्या ‘कोयता भाई’च्या पिंपरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

NCP MP Supriya Sule | शिक्षण मंत्र्यांची उमेदवार मुलीला भर कार्यक्रमात ‘डिस्कॉलिफाय’ करण्याची धमकी, सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या…

पुण्यात ट्रॅफिक जाममुळे महिलेचा मृत्यू, 17 तासानंतर वडगाव शेरी चौकातील टँकर बाजूला

Pune Drug Case | ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील ‘उद्योगी’ कर्मचार्‍याला अटक; ससूनमधील भानगडी समोर येणार?

भरधाव डंपर चालकाने रोड क्रॉस करणाऱ्या इसमास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू, गुन्ह्यातून डंपर चालकाची निर्दोष मुक्तता

मनाविरुद्ध मुलाला जन्म दिल्याने विवाहितेचा छळ, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासूला अटक; भोसरी परिसरातील घटना