Pune Crime News | सोसायटीत जाऊन टोळक्याची दहशत, रहिवाश्यांना जीवे मारण्याची धमकी; वानवडी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | फुटबॉल खेळताना (Playing Football) झालेल्या वादातून टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण (Beating) केल्यची घटना घडली आहे. ही घटना (Pune Crime News) वानवडी परिसरात घडली असून या प्रकरणी सात जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. तर वानवडी पोलिसांनी (Pune Police) तीन जणांना अटक (Arrest) केली आहे.

निहीर चंद्रकांत पटेल Nihir Chandrakant Patel (वय-32) किशन पंडीत दळवी Kishan Pandit Dalvi (वय-28), ब्रायन अलेक्झांडर Brian Alexander (तिघे. रा. घोरपडी) यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत साहिल सुनील सिन्हा Sahil Sunil Sinha (वय-31) याने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanavadi Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फुटबॉल खेळत असताना त्यांच्यामध्ये वाद झाला होता. निहीर, किशन आणि ब्रायन यांच्यासह साथीदार हे साहिल राहत असलेल्या सोसायटीत आले. त्यांनी साहिलला शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच तोडफोड केली.

त्यावेळी सोसायटीत राहणारे नागरिक मध्यस्थी करण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन धमकी दिली. साहिलला वाचवण्यासाठी कोणी पुढे आले, तर त्याला जीवे मारु (Death Threats), अशी धमकी आरोपींनी दिली. सोसायटीच्या आवारात दहशत माजवून आरोपी पळून गेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शितोळे (PSI Shitole) करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | criminals terrorin wanwadi society death threats to residents

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा