Pune Crime News | ‘माणिकचंद ऑक्सिरिच’ बनावट लेबल लावणार्‍या ‘ऑक्सिटॉप’ कंपनीच्या मालकावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइ –  Pune Crime News | नामांकित मिनरल वॉटर ‘माणिकचंद ऑक्सिरीच’ (Manikchand Oxyrich)’ या कंपनीच्या पाण्याच्या बाटलीवरील लेबल सारखे बनावट लेबल तयार करून पाण्याच्या बाटल्यांच्या (Water Bottles) लावून त्याची विक्री करणाऱ्या ’ऑक्सिटॉप’ (Oxytop) कंपनीच्या मालकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार मे 2023 मध्ये वाकी खुर्द, चाकण येथे उघडकीस आला. याप्रकरणी माणिकचंद माणिकचंद ऑक्सिरीच वॉटर तयार करणार्‍या आरएमडी फुड्स अँड बेव्हरेजस (RMD Foods and Beverages) या कंपनीच्या संचालिका शोभा रसिकलाल धारीवाल Shobha Rasiklal Dhariwal (वय – 68, रा. कोरेगाव पार्क, पुणे) यांनी चाकण पोलिस ठाण्यात (Chakan Police Station) फिर्याद दिली आहे.(Pune Crime News)

त्यानुसार, ऑक्सिटॉप कंपनीचा मालक महेंद्र गोरे Mahendra Gore (रा. वाकीखुर्द, चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शोभा धारिवाल यांना मे 2023 मध्ये आपल्या कंपनीच्या लेबल सारखे हुबेहूब लेबल असलेल्या पाण्याच्या बाटल्यांची विक्री विविध ठिकाणी होत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी माहिती घेतली असता या बनावट पाण्याची बाटली महिंद्रा ऑक्सिटॉप कंपनीची (Mahindra Oxitop Company) असुन ही कंपनी आरोपी महेंद्र गोरे याची असल्याचे समजले.

 

त्यावर त्यांनी अधिक माहीती घेण्यासाठी व्यापार विभागाशी संपर्क साधला असता
आरोपीने कोणतीही ट्रेड मार्क मान्यता घेतली नसल्याचे समोर आले.
आरोपी गोरे याची महिद्रा एन्टरप्रायजेस ही कंपनी उत्पादित करीत असलेल्या बाटलीवर जाणीवपूर्वक माणिकचंद ऑक्सिरिच कंपनी सारखे लेबल (अक्षरांची साईज, फॉन्ड व अक्षरांची ठेवण कलर) चिटकवून ग्राहकांची फसवणुक करीत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चाकण पोलिस तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News FIR against the owner of the company ‘Oxitop’ for fake label ‘Manikchand Oxyrich’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : कोंढव्यातील हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई,
4 जणांवर FIR

Maharashtra Political Crisis | ‘…तरीही निर्लज्जासारखं हसतायत’, सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ वकिलांची संतप्त प्रतिक्रिया

Pune News | एरंडवणे-कर्वेनगर भागातील प्रलंबीत कामे लवकर पूर्ण करा, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांची मागणी

Ajit Pawar | कोर्टाच्या निकालावर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया; म्हणाले – ‘मी दिल्लीला…’

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन – सोसायटीच्या वॉचमन्सला हत्याराचा धाक
दाखवून चंदनाच्या झाडांची चोरी करणार्‍या टोळीला अटक