Pune Crime News | महिला सुरक्षा रक्षकासोबत अश्लील बोलणाऱ्या सुपरवायझरवर FIR; हडपसरमधील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकीत टॉवरमध्ये सुरक्षा रक्षक (Security Guard) म्हणून काम करणाऱ्या महिलेसोबत अश्लील बोलून मानसिक त्रास देणाऱ्या सुपरवायझरवर (Supervisor) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Pune Police) शनिवारी (दि.21) एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत खराडी परिसरात राहणाऱ्या 28 वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रभुदास हरीभाऊ डोंगरे Prabhudas Haribhau Dongre (वय-45 रा. देवाची ऊरळी, होले वस्ती, पुणे) याच्याविरुद्ध आयपीसी 509 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या हडपसर परिसरातील एका नामांकित टॉवरमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. तर आरोपी डोंगरे हा महिलेचा सुपरवायझर आहे. फिर्यादी या कामावर असताना आरोपीने त्यांचा सतत अपमान केला. तसेच अश्लील बोलून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पीडित महिलेने तक्रार देताच पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कवळे (PSI Kavale) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन विनयभंग, धायरी येथील घटना; तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पोलीस भरती करण्याचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार, वानवडी परिसरातील घटना, अ‍ॅकॅडमी चालकावर FIR

Vinayak Mete Nephew Suicide | धक्कादायक! शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुतण्याची आत्महत्या

Pune Accident News | पुणे – सोलापूर महामार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, दोन तरुण ठार

Police Commemoration Day | पोलीस स्मृती दिनानिमित्त पोलीस हुतात्मा स्मृती स्मारकाला अभिवादन

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना जोरदार टोला, म्हणाले – ”हे म्हणजे बॉम्बस्फोटाच्यावेळी दाऊद भाजपाचा…”