Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – पुण्यातील तथाकथित पत्रकाराला अटक; महिलेचा विनयभंग करुन दिली धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime News | मुलांचे शाळेचे दाखले काढून देण्याच्या बहाण्याने ९१ हजार रुपये घेऊन फसवणूक (Cheating Case) करणारा तसेच पैशांविषयी विचारल्यावर महिलेचा विनयभंग (Molestation Case) करणार्‍या पत्रकाराला (Journalist In Pune) लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police Station) अटक केली. (Pune Crime News)

हनुमंत राजकुमार सुरवसे Hanumant Rajkumar Suravse (वय २७, रा. हवेली – Haveli) असे अटक केलेल्या यु ट्युब चॅनेलच्या पत्रकाराचे नाव आहे. याबाबत हिंजवडीतील (Hinjawadi) एका ४९ वर्षाच्या महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३०५/२३) दिली आहे. हा प्रकार कदम वाक वस्तीतील (Kadam Wak Wasti) एका शाळेत जानेवारी ते २१ मार्च २०२३ दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हनुमंत सुरवसे हा फिर्यादीच्या ओळखीचा आहे. फिर्यादी यांच्या दोन मुलांचे शाळेचा दाखल काढून देण्यासाठी सुरवसे याने ९१ हजार रुपये घेतले. तरीही त्यांना शाळेचा दाखला (School Leaving Certificate) काढून दिला नाही. त्यामुळे त्या कदमवाक वस्तीत आल्या होत्या. तेथे त्यांनी सुरवसे याला पैशांबाबत विचारले (Fraud Case). तेव्हा त्याने फिर्यादीस अश्लिल शिवीगाळ (Obscene Abuse) करुन मी पत्रकार आहे. माझे कोणी वाकडे करु शकणार नाही, असे बोलून फिर्यादी यांना ढकलून देऊन त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर (PSI Pramod Hambir) तपास करीत आहेत.

 

Web Title :-  Pune Crime News | Loni Kalbhor Police Station – Pune so-called journalist arrested;
The woman was molested and threatened

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 पुणे क्राईम न्यूज : वारजे माळवाडी पोलिस स्टेशन – अमरजीत गोयलचा ब्लेडने वार करून खून, एकाला अटक

Nana Patole | ‘सत्तेची भूक भागविण्यासाठी भाजप काहीही करायला तयार’, नाना पटोलेंचा हल्लाबोल

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – पुण्यातील बड्या बिल्डरच्या बंगल्याचे लॉक तोडून 79 लाखाची चोरी,
सेनापती बापट रस्त्यावरील घटना

Maharashtra Politics News | महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोणाचा?, शरद पवार म्हणाले…

NCP MLA Rohit Pawar | ‘मी पुन्हा येईल हे आघाडीसाठी नसून…’ फडणवीसांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची खोचक टिप्पणी; म्हणाले…