Pune Crime News | कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून पळाला, कारागृहाच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील येरवडा कारागृहातून (Yerwada Jail) पुन्हा एकदा कैदी पळून गेल्याची घटना घडली आहे. येरवडा कारागृहात असलेला कुख्यात गुन्हेगार आशिष जाधव (Criminal Ashish Jadhav) हा येरवडा जेलमधून पळून गेला आहे. त्यामुळे येरवडा कारागृहाच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या (Warje Malwadi Police Station) हद्दीतील एका खुनाच्या गुन्ह्यात 2008 पासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. कुख्यात आरोपी कारागृहातून पळून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)

आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात होता. जाधवला येरवडा कारागृहातील रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. काल दुपारच्या सुमारास तुरुंग अधिकारी कैद्यांची मोजणी करताना त्यांना आशिष जाधव दिसला नाही. त्यामुळे जाधव पळून गेल्याचे लक्षात आले. (Pune Crime News)

राज्यातील सर्वात संवेदनशील आणि कडक सुरक्षेसाठी ओळखल्या जाणाऱ्या येरवडा कारागृहातून कुख्यात गुन्हेगार पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

‘यहाँ का डॉन बाल्या भाई’ म्हणत वाहनांची तोडफोड करुन पसरवली दहशत, स्वारगेट परिसरातील घटना

ललित पाटील पलायन प्रकरण : ललित पाटीलला पळून जाण्यास मदत करणारे दोन पोलीस बडतर्फ

रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले

पत्नीबाबत अपशब्द बोलणे भोवले ! नर्‍हेच्या डोंगराजवळ तरुणाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक

Female Dead Body Found On Metro Site | धक्कादायक! मेट्रो साइटवर सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, खुनाचा संशय

शेतजमिनीच्या वादातून नातेवाईकांनी केली मारहाण, 10 जणांवर FIR; उरुळी कांचन मधील घटना