Pune Crime News | पीटीच्या शिक्षिकेचे फोटो व्हायरल करुन विनयभंग, पुण्यातील खळबळजनक घटना
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यामध्ये दिवसेंदिवस महिला सुरक्षिततेचा मुद्दा गंभीर बनत चालला असून विनयभंगाच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. अशातच एका महिला शिक्षिकेचे फोटो सोशल मीडियावर (PT Teacher Photos On Social Media) पोस्ट करुन विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना पुण्यात घडली आहे. यामुळे पुण्याच्या महिला सुरक्षेबाबत पुणे पोलीस काही पाऊलं उचलणार की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Pune Crime News)
पुणे शहरात घडणाऱ्या गुन्हेगारीकडे बघितले तर यामध्ये रोजच एक विनयभंग, बलात्काराची घटना असते. त्यामुळे महिला अत्याचार हा नित्याचा झाला आहे. अशातच नाना पेठेत राहणाऱ्या एका महिला पीटी शिक्षिकेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नाना पेठेत राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन 97645xxxxx मोबाईल धारक, व इन्स्टाग्राम धारकांवर आयपीसी 354 (अ) (1) (4), 354(ड), 509, 507, 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी या स्पोर्ट टिचर आहेत. आरोपींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर मेसेज (Instagram Account) पाठवून शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या मैत्रिणीचा फोटो अपलोड करुन त्यावर अश्लील मेसेज (Obscene Messages) पाठवून फिर्यादी यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. फिर्यादी यांनी तक्रार देताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, सहकारनगर व कोरेगाव पार्क परिसरातील घटना
ACB Trap News | लाच स्वीकारताना महिला सरपंचासह पती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
रस्त्यात मिठी मारुन तरुणाला लुटले, नागरिकांनी आरोपीला पकडले
‘मला सलमान भाई म्हणतात’ पिंपरीत ‘कोयता भाई’ची दहशत
भररस्त्यात महिलेचा दुप्पटा ओढून विनयभंग, दोघांना अटक; लोणी काळभोर परिसरातील घटना
जुन्या भांडणातून भोसरीत तरुणावर सत्तुरने वार, दोघांना अटक
नेट बँकिंगचा पासवर्ड घेऊन महिलेची 15 लाखांची फसवणूक, पुण्यातील शनिवार पेठेतील प्रकार