Pune Crime News | पुणे : बहिण-भावाला बेदम मारहाण; 50 वर्षाच्या व्यक्तीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | भावाकडे रागाने पाहिल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एका 50 वर्षीय व्यक्तीने बहिण-भावाला स्क्रु-ड्रायव्हर व विटेने बेदम मारहाण (Beating) करुन जखमी केल्याची घटना हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) आरोपीला अटक केली आहे. ही घटना गोंधळेनगर येथील शिवमंदिर रोडवर रविवारी (दि.19) सकाळी दहाच्या सुमारास घडली. (Pune Crime News)

याबाबत विजय शंकर कुंभार (वय-27 रा. शिवमंदिर रोड, गोंधळेगनर, हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. तर रविंद्र शरनबसप्पा साबने Ravindra Sharanbasappa Sabne (वय-50 रा. शिवमंदिर रोड, गोंधळेनगर, हडपसर) याच्यावर आयपीसी 324, 352, 504 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय कुंभार आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. आरोपीने फिर्यादी यांचा भाऊ रवी कुंभार याच्याकडे रागाने पाहिले. रवी याने याचा जाब आरोपीला विचारला. याचा राग आल्याने रविंद्र साबने याने फिर्यादी यांच्या भावाच्या अंगावर धावुन जात हातातील स्क्रु-ड्रायव्हरने हातावर मारुन जखमी केले. तर फिर्यादी यांच्या बहिणीच्या पायावर विटेने मारुन जखमी केले. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले

पत्नीबाबत अपशब्द बोलणे भोवले ! नर्‍हेच्या डोंगराजवळ तरुणाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक

Female Dead Body Found On Metro Site | धक्कादायक! मेट्रो साइटवर सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, खुनाचा संशय

शेतजमिनीच्या वादातून नातेवाईकांनी केली मारहाण, 10 जणांवर FIR; उरुळी कांचन मधील घटना

मारहाण करुन पळून जाणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडले, कोंढवा बुद्रुक येथील प्रकार

‘दोन मिनीट थांब देतो सिगारेट’ असे म्हटल्याच्या रागातून टपरीवाल्यावर ब्लेडने वार, बिबवेवाडी मधील घटना