Pune Crime News | मित्राच्या पत्नीला फोन करतो म्हणून गोळीबार, पुणे जिल्ह्यातील घटना

राजगुरुनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मित्राच्या पत्नीला फोन करतो या कारणावरुन एका तरुणावर गोळीबार (Firing In Pune) करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात घडली आहे. ही घटना चांदुस येथे गुरुवारी (दि.23) घडली आहे. या घटनेत तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Pune Crime News)

या घटनेत शुभम संतोष तांबे (वय-20 रा. आसखेड बुद्रुक, ता. खेड) हा जखमी झाला असून त्याने याबाबत खेड पोलीस ठाण्यात (Khed Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन पोलिसांनी अंकुर कारले व केतन कारले (रा. चांदूस ता. खेड) या दोघांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम तांबे हा केतन कारले याच्या पत्नीला फोन करतो या कारणावरून सात महिन्यापूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. याच भांडणाच्या कारणातुन केतन कारले याने शुभम तांबे याला फोन करुन अंकुर कारले हा मला मारणार आहे तु माझ्या घरी येवुन मला घेवुन जा असे सांगून घरी बोलावून घेतले.

शुभम तांबे केतनच्या घरी गेला असता अंकुर कारले हा तिथेच होता.
त्याने केतन कारले याच्या पत्नीच्या कारणावरुन व झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन
पिस्तुलातून शुभमच्या पोटात गोळी मारली. यामध्ये शुभम गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे. तर गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे (PI Rajkumar Kendre) यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | संरक्षण दलातील अधिकाऱ्याची तब्बल 74 लाखांची फसवणूक,
दापोडी मधील घटना

ACB Trap News | लाच स्वीकारताना महिला सरपंचासह पती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

रस्त्यात मिठी मारुन तरुणाला लुटले, नागरिकांनी आरोपीला पकडले

‘मला सलमान भाई म्हणतात’ पिंपरीत ‘कोयता भाई’ची दहशत

भररस्त्यात महिलेचा दुप्पटा ओढून विनयभंग, दोघांना अटक; लोणी काळभोर परिसरातील घटना

जुन्या भांडणातून भोसरीत तरुणावर सत्तुरने वार, दोघांना अटक

नेट बँकिंगचा पासवर्ड घेऊन महिलेची 15 लाखांची फसवणूक, पुण्यातील शनिवार पेठेतील प्रकार