
Pune Crime News | गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले 5 सराईत गुन्हेगार पुणे जिल्ह्यातून तडीपार, पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची कारवाई
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 5 सराईत गुन्हेगारांवर (Criminals On Pune Police Records) परिमंडळ 2 च्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil) यांनी तडीपारीची कारवाई केली आहे (Tadipar Action). पोलिस स्टेशनकडून प्राप्त झालेल्या तडीपार प्रस्तावाची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 5 जणांना पुणे शहर (Pune City), पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय (Pimpri-Chinchwad Police Commissionerate) आणि पुणे जिल्हयातून (Pune District) तडीपार करण्यात आले आहे. (Pune Crime News )
तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या (Bundgarden Police Station) हद्दीतील महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे नटी उर्फ रोहन उर्फ ऋषिकेश मोहन निगडे (वय-28), अजय काळुराम साळुंके उर्फ धार अज्या (वय-23), संतोष सिद्धार्थ चव्हाण (वय-27), अजय उर्फ सोन्या गिरीप्पा दोडमणी (वय-27 सर्व रा. ताडीवाला रोड, पुणे) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 नुसार आशिष सुनिल मापारे (वय-27 रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली सध्या रा. प्रायव्हेट रोड, पुणे) यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime News)
परिमंडळ दोन मधील पोलिस स्टेशनच्या अभिलेखावरील खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), खंडणी, दरोडा (Robbery), दुखापत (Injury), जबरी चोरी, बलात्कार (Rape In Pune), विनयभंग (Molestation Case), बाल लैंगिक अत्याचार (Child Sexual Abuse), पुरावा नष्ट करणे, दहशत माजवणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, शिवीगाळ, मारहाण अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर कायद्याचा वचक रहावा म्हणून संबंधित पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी (Senior Police Inspector) आरोपींच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडे पाठवला होता. प्रस्तावाची चौकशी पुर्ण केल्यानंतर 5 गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम (Maharashtra Police Act) 55 व 56 प्रमाणे हद्दपार करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी केली आहे.
आगामी काळात देखील झोन दोन मधील पोलिसांच्या रेकॉर्डवरील सक्रिय गुन्हेगारांवर अशाच प्रकारची ठोस प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
MHADA Pune Lottery | म्हाडातर्फे 5 हजार 863 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात
रास्तापेठ अतिउच्चदाब उपकेंद्र दुरुस्तीसाठी बंद राहणार; मात्र वीजपुरवठ्यावर परिणाम नाही
‘ज्यांनी मराठा आरक्षण घालविले, ते ‘घरातील महामहीम’ उद्धव ठाकरे हे माफी केव्हा मागणार?’,
भाजपचा हल्लाबोल